Sunday, March 30, 2025
Homeनगरउसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीखाली एकाचा मृत्यू

उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीखाली एकाचा मृत्यू

देवगाव (वार्ताहर)- नेवासा तालुक्यातील देवगाव येथे ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर ट्रॉलीच्या मागच्या चाकाखाली सापडून देवगाव येथील एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना काल सायंकाळी घडली.

याबाबत माहिती अशी की, काल शनिवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास देवगाव ते भेंडा फॅक्टरी दरम्यान जाणार्‍या रस्त्याने देवगाव येथील नामदेव बळवंता आगळे (वय 70) हे पायी चालले होते. भेंडा फॅक्टरी येथील ट्रॉलीसह असलेला ट्रॅक्टर (एमएच 21 डी 2257) ऊस घेवून ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याकडे चालला होता. या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीच्या चाकाखाली येवून नामदेव बळवंता आगळे त्यांचा मृत्यू झाला.

- Advertisement -

देवगाव ते भेंडा फॅक्टरीकडे जाणार्‍या या रस्त्याने आतापर्यंत अनेक लहान मोठे अपघात घडले आाहेत. रस्त्याची अत्यंत दयनीय आवस्था झालेली आहे. रस्त्याच्या कडेला लहान-मोठे खड्डे पडलेले असून साईटपट्टीही व्यवस्थीत नाही.

या रस्त्याने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनी दररोज जीव मुठीत धरुन ये-जा करतात.कारखाना गाळप हंगाम सुरु झाल्यावर कारखाना कर्मचार्‍यांसह ऊस वाहतूक करणारी वाहने मोठ्या संख्येने ये-जा करतात त्यामुळे मोठी रहदारी असते. गाळप हंगाम सुरु होण्यापूर्वी रस्त्याची साईडपट्टी न भरल्याने व रस्त्याच्या कडेची झाड़ेझुडपे न तोडल्याने समोरुन येणारे वाहन अनेकदा लवकर दिसत नाही. त्यामुळे लहान-मोठे अपघात नेहमीच घडतात. रस्ता दुरुस्ती फक्त कागदावरच राहत असल्याची खंत परिसरातील नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

रस्त्याची साईडपट्टी व्यवस्थीत असती तर आज या वयोवृध्दाला आपला जीव गमवावा लागला नसता अशी खंत ग्रामस्थामधून निघत आहे. मनमिळावू स्वभावाचे मयत नामदेव आगळे हे परिसरात नामदेवमामा म्हणून ओळखले जात. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

IPL 2025 : आयपीएलमध्ये आज सुपर संडे; ‘या’ संघांत होणार लढत,...

0
मुंबई | Mumbai इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये आज (रविवारी) दोन सामने होणार आहेत. यातील पहिला सामना दुपारी ३.३० वाजता दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स...