Tuesday, March 25, 2025
Homeनाशिकदुर्दैवी : कार अपघातात १ ठार; ३ जण गंभीर जखमी

दुर्दैवी : कार अपघातात १ ठार; ३ जण गंभीर जखमी

घोटी । जाकीर शेख Ghoti

नागपूर -मुंबई समृद्धी महामार्गावरील इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर येथील दारणा नदीच्या पुलावर भीषण अपघातात १ जण जागीच ठार झाला. बुधवार दि. २९ रोजी दुपारच्या सुमारास MH 05 BS 5164 ह्या वेरणा कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी बाजूच्या भिंतीला जाऊन जोरदार धडकली.

- Advertisement -

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

जोरदार धडकलेल्या या अपघातात वाहनचालकाचा मृत्यू झाला असून २ महिला आणि १ पुरुष असे ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती समजताच महामार्ग पोलीस केंद्र घोटीचे पोलीस कर्मचारी व घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सागर सौदागर, गौरव सोनवणे हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी जखमी व्यक्तींना तत्काळ समृद्धी महामार्गाच्या रुग्णवाहिकेद्वारे धामणगाव येथील एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या अपघातातील जखमी व्यक्तींची नावे समजली नसून याबाबत पुढील तपास घोटी पोलीस पथकाकडून करण्यात येत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...