Thursday, July 9, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : खरात प्रकरणात एसआयटीसमोर रुपाली चाकणकरांची चौकशी; म्हणाल्या 'तपासात पूर्ण…...'

Nashik News : खरात प्रकरणात एसआयटीसमोर रुपाली चाकणकरांची चौकशी; म्हणाल्या ‘तपासात पूर्ण……’

नाशिक | प्रतिनिधी Nashik

अशोक खरात प्रकरणात राज्यभर चर्चेत असलेल्या घडामोडींमध्ये आता राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची एसआयटीकडून सखोल चौकशी करण्यात आली. जवळपास साडेपाच तास चाललेल्या या चौकशीनंतर चाकणकर यांनी माध्यमांशी संवाद साधत आपली पहिली प्रतिक्रिया दिली.

- Advertisement -

“एसआयटीने विचारलेल्या सर्व प्रश्नांची मी समर्पक आणि सविस्तर उत्तरं दिली आहेत. माझ्या उत्तरांमुळे चौकशी यंत्रणेचं समाधान झालं असेल, असा मला विश्वास आहे,” असे त्या म्हणाल्या., “तपासासाठी पोलिसांना जसं सहकार्य अपेक्षित असेल तसं मी पूर्ण सहकार्य करेन,” असे त्यांनी स्पष्ट केले.

चौकशीदरम्यान नेमके कोणते प्रश्न विचारण्यात आले, याबाबतही पत्रकारांनी विचारणा केली. त्यावर “अहवाल समोर आल्यानंतर सर्व माहिती स्पष्ट होईल,” असे चाकणकर यांनी सांगितले.

माहितीनुसार, दुपारी एक वाजण्याच्या सुमारास चौकशीला सुरुवात झाली होती. एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली ही चौकशी पार पडली.

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरा धरण 65 टक्के भरले; निळवंडेत ‘एवढा’ पाणीसाठा

0
अतिवृष्टीमुळे भातरोपे, बांधांचे प्रचंड नुकसान, पंचनाम्याची मागणी भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara उत्तर नगर जिल्ह्याची भाग्यरेखा असलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात पुनर्वसु नक्षत्रांच्या सरींचे तांडव केल्याने धरणात वेगाने नवीन...