Tuesday, March 25, 2025
Homeदेश विदेशमोठी बातमी! महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी; आतापर्यंत 10 हून अधिक भाविकांचा मृत्यू, अनेक जखमी

मोठी बातमी! महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी; आतापर्यंत 10 हून अधिक भाविकांचा मृत्यू, अनेक जखमी

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) प्रयागराजमध्ये (Prayagraj) सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात (Mahakumbh Mela) (दि.२९) रोजी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास अमृत स्नानादरम्यान चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत १० हून अधिक भाविकांचा (Devotees) मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. तर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, घटना घडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी तीन वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Chief Minister Yogi Adityanath) यांना फोन केल्याची माहिती आहे. तर चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या भाविकांना पोलिसांनी तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केले. तसेच यासाठी ग्रीन कॉरिडॉर देखील तयार करण्यात आला आहे.

दरम्यान, महाकुंभातील चेंगराचेंगरीबाबत (Stampede) संगम नाक्यावर स्नान केल्यामुळे अशी परिस्थिती उद्भवल्याचे सांगितले जात आहे. तर महाकुंभमेळा परिसरात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर, पोलीस आणि सुरक्षा दलांनी (Police and Security Forces) तात्काळ कारवाई करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीनंतर योगी आदित्यनाथ यांची प्रतिक्रिया

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी भाविकांना अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन केले आहे. तसेच गंगा नदीच्या ज्या घाटाजवळ असाल तिथं स्नान करा, संगम घाटाकडे जाण्याचा प्रयत्न करु नका, असं देखील आवाहन त्यांनी केले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...