Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्याबोलेरो-ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील १० जणांचा मृत्यू ,चिमुकली थोडक्यात बचावली

बोलेरो-ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील १० जणांचा मृत्यू ,चिमुकली थोडक्यात बचावली

नवी दिल्ली | New Delhi

छत्तीसगडमधील (Chhattisgarh) धमतरी राष्ट्रीय महामार्ग (National Highway) ३० वर बोलेरो आणि ट्रकची बुधवार (दि.०३) रोजी रात्री धडक झाल्याने भीषण अपघात (Terrible Accident) घडला असून १० जणांचा जागीच मृत्यू (Death) झाला आहे. या अपघातामुळे हळहळ व्यक्त होत असून अपघातात नशीब बलवत्तर म्हणून चिमुकली वाचली आहे…

- Advertisement -

Photo Gallery : शालिमार परिसरातील दुकाने मनपाकडून जमीनदोस्त

याबाबत पुरूर पोलीस ठाण्याचे (Purur Police Station) प्रभारी अरुण कुमार साहू यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल (बुधवार) रोजी ११ जण बोलेरोमधून सोराम-भाटगाव (Soram-Bhatgaon) येथून एका लग्न समारंभासाठी मरकटोला गावात गेले होते. त्यानंतर तेथून रात्री घरी परतत असतांना धमतरी-कांकेर राष्ट्रीय महामार्गावर ( Dhamtari-Kanker National Highway) जगत्रापूर्वी तीन किलोमीटर अंतरावर कांकेरकडून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक आणि बोलेरोची समोरासमोर धडक झाली. त्यात १० जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक चिमुकली थोडक्यात बचावली आहे.

११ मे नंतर राज्यात नवे सरकार? कायदेतज्ञांच्या दाव्याने मोठी खळबळ

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलीस (Police) तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तर जखमी चिमुकलीला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांनी दिली. तसेच हा अपघात इतका भीषण होता की, बोलेरो गाडीचा पूर्णपणे चक्काचूर झाला असून बोलेरो गाडी कापून मृतदेह बाहेर काढण्यात आले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या