Monday, June 24, 2024
Homeदेश विदेशखळबळजनक! भाजपा खासदाराच्या घरात सापडला १० वर्षाच्या मुलाचा मृतदेह

खळबळजनक! भाजपा खासदाराच्या घरात सापडला १० वर्षाच्या मुलाचा मृतदेह

दिल्ली | Delhi

- Advertisement -

आसामच्या सिलचर येथे भाजपा खासदार राजदीप रॉय यांच्या निवासस्थानी १० वर्षांच्या मुलाचा मृतदेह आढळला आहे. यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो पोस्टमॉर्टमसाठी सिलचल मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे. मुलाचे नाव देखील राजदीप रॉय असल्याची माहिती समोर येत आहे..

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मुलाची आई खासदार रॉय यांच्या घरी काही वर्षांपासून मदतनीस म्हणून काम करत होत्या. त्या कचार जिल्ह्यातील पलोंग घाट भागातील रहिवासी असल्याने रोज जाणे-येणे करणे शक्य नसल्याने आपल्या मुलाला आणि मुलीला घेऊन त्या खासदार रॉय यांच्या घरीच राहत होत्या. संबंधित मुलगा पाचवीत शिकत होता.

विद्येच्या मंदिरात द्वेषाचे धडे! भरवर्गात मुस्लीम विद्यार्थ्याला उभं केलं आणि सर्व विद्यार्थ्यांना….

या घटनेची माहिती मिळताच भाजप खासदार राजदीप रॉय घरी पोहोचले. त्यांनी माध्यमांना सांगितले की, मृतदेह ज्या खोलीत आढळला तो दरवाजा आतून बंद होता. पोलिसांनी दरवाजा तोडल्यानंतर आत मुलगा बेशुद्धावस्थेत आढळला. मुलाला रुग्णालयात नेण्यात आले. त्याला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्न केले मात्र खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले अशी माहिती खासदार रॉय यांनी दिली.

Accident : गाडीचा टायर फुटून भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तीन ठार, चार गंभीर

पोलिसांनी म्हटलं की, प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याचं वाटतं. मुलाच्या कुटुंबीयांनीसुद्धा पोलिसांना सांगितले की, व्हिडीओ गेमसाठी मोबाईल न दिल्याने आईवर नाराज होता. आई आणि मुलगी बाजारात गेली. त्याआधी त्याने मोबाईल मागितला होता. तो द्यायला नकार दिला. अर्धा पाऊण तास दोघी बाहेर होत्या. परत आल्या तेव्हा रूमचा दरवाजा बंद होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या