Saturday, May 4, 2024
Homeनंदुरबारदोन वर्षिय बालिकेवर अत्याचार करणार्‍यास 10 वर्ष सश्रम कारावास

दोन वर्षिय बालिकेवर अत्याचार करणार्‍यास 10 वर्ष सश्रम कारावास

नंदुरबार Nandurbar। प्रतिनिधी

तालुक्यातील वाघोदा येथील 2 वर्षीय बालिकेवर (girl) अत्याचार (Tyranny) करणार्‍या आरोपीस (Accused) नंदुरबार सत्र न्यायालयाने (Court) 10 वर्ष सश्रम कारावास (imprisonment) व 1 हजार रुपये दंडाची शिक्षा (Punishment) ठोठावली आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 31 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास तालुक्यातील वाघोदा येथे फिर्यादी (prosecution) महिला यांचे घरातील सर्व सदस्य हे मजुरी कामानिमित्त घराबाहेर गेले होते. तसेच फिर्यादीचे सासरे हे गावात फिरण्याकरीता गेले होते. घरात महिला फिर्यादीसह त्यांची दोन वर्षीय पिडीत मुलगी व दोन्ही मुले होती.

सकाळी 11 वाजेच्या सुमारास फिर्यादी महिलेची पिडीत मुलगी ही शिवदास ऊर्फ काल्या भाईदास ठाकरे (Kalya Bhaidas Thackeray) याच्य अंगणात खेळत असतांना थोडया वेळाने तिचा रडण्याचा आवाज आल्याने फिर्यादी ही शिवदास ठाकरे याच्य घरी गेली असता दरवाजा आतून बंद होता. म्हणून फिर्यादीने बंद दरवाज्याजवळ जावून त्यांच्या मुलीस आवाज दिला असता शिवदास ऊर्फ काल्या भाईदास ठाकरे याने दरवाजा उघडून पिडीत मुलीस घराबाहेर काढले. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यत (Police station) शिवदास ऊर्फ काल्या भाईदास ठाकरे याच्याविरुॠ गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला होता.

पुढील तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक (Police Inspector) बाळासाहेब भापकर (Balasaheb Bhapkar) ठाणे यांनी आरोपीविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. सदर खटल्याची सुनावणी अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश (Judge) आशुतोष भागवत (Ashutosh Bhagwat) यांच्या न्यायालयात होवून आरोपी शिवदास ऊर्फ काल्या भाईदास ठाकरे (रा.वाघोदा, ता.जि.नंदुरबार) याच्याविरुद्ध बा.ले.अ.का.क. (पोक्सो)- 4 अन्वये गुन्हा शाबीत झाल्याने न्यायालयाने त्याल 10 वर्ष सश्रम कारावास व 1 हजार रुपये दंडाची शिक्षा (Punishment) सुनावली.

सदर खटल्याचे कामकाज अभियोग पक्षातर्फे अतिरीक्त जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. तुषार कापडीया यांनी पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून पोहेकॉ/नितीन साबळे व पोना/गिरीष पाटील यांनी कामकाज केले आहे.

तपास अधिकारी, त्यांचे पथक तसेच सरकारी वकील यांचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी अभिनंदन केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या