Tuesday, March 25, 2025
HomeनगरSuicide News : दहावीत शिकणार्‍या विद्यार्थ्याची आत्महत्या

Suicide News : दहावीत शिकणार्‍या विद्यार्थ्याची आत्महत्या

अकोले |प्रतिनिधी| Akole

इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत असणार्‍या एका विद्यार्थ्याने ऐन परीक्षेच्या काळातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज मंगळवारी दुपारी अकोले शहरालगत रेडे गावच्या शिवारात घडली. साई संदीप वाघ असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. रेडे शिवारातील अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ राहणारे व अकोले नगर पंचायतमध्ये कर्मचारी असणारे संदीप जगन्नाथ वाघ यांचा साई हा मुलगा आहे. साई हा सध्या दहावीची परीक्षा देत होता, आणि तो घरात अभ्यास करत असताना त्याने हा टोकाचा निर्णय घेतला.

- Advertisement -

दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घरातील सदस्यांनी त्याच्या रूमचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र दरवाजा आतून बंद असल्यामुळे संशय निर्माण झाला. दरवाजा उघडल्यानंतर साईने गळफास घेतल्याचे आढळून आले. त्यानंतर तातडीने त्याला अकोले येथील भांडकोळी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, परंतु उपचार सुरू होण्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे. मयत साई याचा मृतदेह अकोले ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला होता, शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

रात्री 9 वाजता त्याच्या वर अकोले येथील अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. साई वाघच्या आत्महत्येने अकोले तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेबाबत अकोले पोलीस ठाण्यात साईचे आजोबा जय महाराष्ट्र ग्लास हाऊसचे संचालक भारत पिंगळे यांनी खबर दिली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...