Wednesday, October 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमोशी कचरा डेपो दुर्घटनेत आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू; एकाचा शोध सुरू

मोशी कचरा डेपो दुर्घटनेत आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू; एकाचा शोध सुरू

प्रशासनाच्या ढिम्म कारभारावर नातेवाईकांकडून प्रचंड संताप

- Advertisement -

पुणे | प्रतिनिधी Pune

पिंपरी-चिंचवडच्या मोशी येथील महापालिकेच्या वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पात मुसळधार पावसामुळे कचऱ्याचा मोठा ढिगारा घसरून प्रशासकीय इमारतीवर कोसळल्याने भीषण दुर्घटना घडली. या घटनेत अडकलेल्या २३ जणांपैकी १४ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून ८ जणांचा मृत्यू झाला आहे.दुर्घटनाग्रस्त इमारतीतील बचावकार्य पूर्ण झाले असून सर्व ८ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मात्र इमारतीबाहेरील कचऱ्याखाली दबलेल्या आणखी एका व्यक्तीचा शोध अद्याप सुरू आहे.

यावेळी मृतांच्या नातेवाईकांची प्रचंड आगतिकता आक्रोशाच्या स्वरूपात समोर आली होती.पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी अशा सर्वांच्या हलगर्जीपणामुळेच आमची माणसं मारली असा आरोप नातेवाईकांनी केला..

दुर्घटनाग्रस्त इमारतीचा कठीण काँक्रिटचा भाग फोडण्यासाठी घटनास्थळी आणखी एक अत्याधुनिक ‘डिमोलीशन एक्सकॅव्हेटर मशीन’ आणण्यात आले असून, युद्धपातळीवर शोधमोहीम राबविण्यात आली. दुर्घटनाग्रस्त इमारतीचा स्लॅब आणि काँक्रिटचा कठीण भाग अत्यंत वजनदार असल्याने सामान्य यंत्रणेच्या साहाय्याने तो बाजूला करणे कठीण जात होते. हे आव्हान लक्षात घेऊन प्रशासनाने घटनास्थळी तातडीने अत्याधुनिक ‘डिमोलीशन एक्सकॅव्हेटर मशीन’ पाचारण केले आहे. या अत्याधुनिक यंत्राच्या साहाय्याने काँक्रिटचे अडथळे वेगाने दूर केले जात असून, त्यामुळे बचावकार्याला मोठा वेग आला आहे.

ताज्या बातम्या

उत्तर प्रदेशात भाजपला धक्का? बडा नेत्याच्या ‘टाटा बाय-बाय’ पोस्टने राजकीय चर्चेला...

0
दिल्ली | Delhi उत्तर प्रदेशच्या राजकारणात विधानसभा निवडणुकीपूर्वीच राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये अंतर्गत नाराजी असल्याची चर्चा सुरू असतानाच पक्षाचे माजी...