शहादा | ता.प्र.SHAHADA
गुजरात राज्यातील बडोदा येथून विनापरवाना (without license) येणारे ११ लाख किमतीचे ८५७ पाकीट कापूस (Cotton seed) बियाणे कृषी विभागाच्या (Agriculture Department) भरारी पथकाने (Bharari team) सापळा रचून (setting a trap) सारंगखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत (caught up)पकडले. तालुक्यात ही पहिलीच सर्वात मोठी कारवाई असून बोगस कापूस बियाणे विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. यावेळी ११ लाख किमतीचे बियाणे व वाहन जप्त करण्यात आले आहे.
सारंगखेडा (ता.शहादा) पोलीस ठाण्याअंतर्गत आज दि.२६ रोजी पाच वाजेच्या सुमारास जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक नरेंद्र पाडवी यांना विनापरवाना कापूस बियाणे खाजगी वाहनाने येत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक नरेंद्र पाडवी यांनी विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नितेंद्र पानपाटील व शहादा तालुका कृषी अधिकारी किशोर हडपे, कृषी अधिकारी योगेश हिवराळे, अभय कौर यांनी पोलिसांच्या मदतीने सापळा रचला. वाहन (क्र.जीजे ६-पीसी ३५३२) अडविले असता वाहनचालक चंद्रकांत पांडूरंग माळी (रा.कळंबू, ता.शहादा) याने विनापरवाना बियाणे गुजरात राज्यातील बडोदा जिल्ह्यातून आणल्याचे कबुल केले.
विभागीय कृषी सहसंचालक, नाशिक विभाग, नाशिक व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तानाजी खर्डे, जि. प. कृषी विकास अधिकारी प्रकाश खरमाळे तसेच तंत्र अधिकारी संजय शेवाळे यांच्यापरवानगीने पुढील कायदेशीर कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे. सदर वाहनात एकूण १३ पोते (८५७ पाकिटे) होते त्याची अंदाजीत किंमत ११ लाख असून संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी बियाणे कायदा १९६६, महाराष्ट्र कापूस बियाणे नियंत्रण कायदा २००९, बियाणे नियंत्रण आदेश १९८३ अन्वये शासनाची व शेतकऱ्यांची फसवणूक करण्याच्या कारणावरून गुन्हा दाखल करण्याचे काम सारंगखेडा पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
बोगस बियाणे विक्रेत्यांचे धाबे दणाणले
दरम्यान, कृषी विभागाच्या भरारी पथकाने बियाण्याची गाडी पकडली असल्याची माहिती कर्णोपकर्णी तालुकाभर पसरल्यानंतर ग्रामीण भागातील बहुतांश बोगस कापूस बियाणे विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. काहींनी आपला माल सुरक्षित स्थळी हलविल्याचे समजते.