Wednesday, September 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजबेपत्ता तरूणाचा मृतदेह आढळला

बेपत्ता तरूणाचा मृतदेह आढळला

सटाणा | वार्ताहर Satana

- Advertisement -

तालुक्यातील आराई येथील चार ते पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह मुळाणे शिवारातील मुळेश्वर डोंगर परिसरात आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विष्णू बळीराम माळी २५, रा. आराई) असे मृत तरुणाचे नाव आहे.

विष्णू माळी हा गेल्या चार ते पाच दिवसांपासून घरातून बेपत्ता होता. याबाबत त्याच्या नातेवाईकांनी तसेच पोलिस पाटील कारभारी भदाणे यांनी सटाणा पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांकडून शोधमोहीम सुरू होती.

दरम्यान, बुधवारी दुपारी मुळाणे येथील एक तरुण दोधेश्वर परिसरातील जंगलात जनावरे चारण्यासाठी गेला असता त्याला डोंगरावर एक मृतदेह आढळून आला. त्याने ही माहिती तत्काळ मुळाणे येथील पोलिस पाटील प्रतिभा पाटील यांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस पाटील यांनी सटाणा पोलिसांना कळवले.

पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे, कर्मचारी गणेश गरुड, भुषण सूर्यवंशी आणि रविंद्र सोनवणे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. ही घटना गंभीर स्वरूपाची असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा अधिक तपास सटाणा पोलीस करीत आहेत.

ताज्या बातम्या

Rahata : राहाता बाजार समितीत डाळिंबाची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata बुधवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) डाळिंबाला प्रतिकिलोला 305 रुपये भाव मिळाला. डाळिंबाच्या (Pomegranate) 4734 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर...