Thursday, September 19, 2024
Homeराजकीयपंकजा मुंडे, मिलिंद नार्वेकरांसह विधानपरिषदेच्या ११ सदस्यांनी घेतली आमदारकीची शपथ

पंकजा मुंडे, मिलिंद नार्वेकरांसह विधानपरिषदेच्या ११ सदस्यांनी घेतली आमदारकीची शपथ

मुंबई | Mumbai

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) निकालानंतर काही दिवसांपूर्वी राज्यात विधानपरिषदेची निवडणूक (Vidhan Parishad Election) पार पडली होती. या निवडणुकीत महायुतीचे (Mahayuti) ०९ तर महाविकास आघाडीचे ०२ उमेदवार निवडून आले होते. आज या सर्व ११ विजयी उमेदवारांनी आमदारकीची शपथ घेतली आहे. विधान भवनातील विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात हा शपथविधी सोहळा पार पडला असून विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी त्यांना शपथ दिली.

हे देखील वाचा : Maharashtra Governor : सी. पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल; रमेश बैस यांची उचलबांगडी

शपथ घेतलेल्यांमध्ये भाजपच्या (BJP) पंकजा मुंडे,योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे, आणि सदाभाऊ खोत यांचा समावेश आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेच्या (Shivsena) कुपाल तुमाने, भावना गवळी तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांनी आमदारकीची शपथ घेतली. तसेच मविआतील ठाकरेंच्या शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर आणि काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांचा समावेश आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : वाॅचमनला धमकावत टाकला दराेडा; गस्तीदरम्यान पाच जणांना अटक

विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यामध्ये महायुतीचे ०९ आणि महाविकास आघाडीचे ०२ उमेदवार निवडून आले होते. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेल्या शेकपचे जयंत पाटील यांचा पराभव झाला होता. या निवडणुकीत काँग्रेसची ८ मते फुटल्याचे प्रथमदर्शन दिसून आले होते. विधानपरिषदेच्या या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा वरचष्मा दिसून आला होता.

हे देखील वाचा : “… तर राजकारणातून संन्यास घेईल”; प्रफुल्ल पटेलांचे मोठे विधान

दरम्यान, काँग्रेसच्या (Congress) राज्य पातळीवरील नेतृत्वाने तातडीने विधानपरिषदेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांची दखल घेत त्यांची नावे हायकमांडकडे पाठवली आहेत. मात्र, हायकमांडने यावर कुठलाही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आता या आमदारांवर काय कारवाई केली जाते हे बघणे महत्वाचे असणार आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या