Saturday, May 18, 2024
Homeमुख्य बातम्या‘सुपर 50’ उपक्रमात 110 विद्यार्थी

‘सुपर 50’ उपक्रमात 110 विद्यार्थी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषदेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी सुपर 50 उपक्रम यंदा देखील राबवण्यात येणार आहे. नाशिक जिल्हयातील ग्रामीण भागातील शासकीय, अनुदानित, अंशतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) माहे मार्च, 2023 च्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यांची शैक्षणिक वर्ष सन 2023 24 व 2024-25 या दोन वर्षांसाठी सदर उपक्रमास एकूण 110 विद्यार्थ्यांची (55 जईईसाठी व 55 एनईईटीसाठी) उपक्रमाच्या निकषाच्या आधारे निवड करण्यात येणार आहे.

- Advertisement -

निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष सन 2023 24 व 2024-25 मध्ये जईई व नीट परीक्षेसाठी निवासी स्वरूपाचे प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी दि. 9 जुलै रोजी जिल्ह्यात निवड परीक्षा राबवण्यात येणार असून निवड परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज सादर करावा लागणार आहे, 26 जून दरम्यान विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज करण्यासाठी मुदत आहे. हा प्रवेश अर्ज प्रत्येक पंचायत समिती मध्ये गट शिक्षण अधिकारी सादर करावा लागणार असून प्रत्येक तालुक्यात परीक्षेसाठी परीक्षा केंद्र असणार आहे.

शिक्षण हक्क कायद्यात सुधारणा; पाचवी, आठवीच्या परीक्षांबाबत महत्वपूर्ण निर्णय; वाचा सविस्तर

प्रत्येक तालुकास्तरावर परीक्षा केंद्र राहील. 9जुलै रोजी वेळ सकाळी 10.00 ते दुपारी 12.30 विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर सकाळी 9.00 वाजता उपस्थित राहावे. एखादा विद्यार्थी मार्च, 2022 मध्ये 10 वी उत्तीर्ण झाला असेल अशा विद्यार्थ्यांची उपक्रमासाठी निवड झाल्यास त्यास पुनश्च इयत्ता 11 वीत प्रवेश घ्यावा लागेल.

ट्रॅक्टर व दुचाकीच्या अपघातात युवकाचा मृत्यू; एक जण गंभीर जखमी

पात्रता व नियम

विद्यार्थी नाशिक जिल्हयातील ग्रामिण भागातील शासकीय, अनुदानित, अंशतः अनुदानित विद्यालयातून माहे मार्च 2023 मध्ये इ.10 वीच्या परीक्षेत 70 टक्के गुणांनी उत्तीर्ण झालेला असावा. विना अनुदानित, स्वयंअर्थसहाय्यीत शाळांमधील विद्यार्थ्यांनी अर्ज करु नये.

इच्छूक असणार्‍या विद्यार्थ्यास सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात विज्ञान शाखेत प्रवेश घेणे बंधनकारक राहील.

विद्यार्थ्याच्या पालकांचे उत्पन्नाची कमाल मर्यादा 1 लक्ष इतकी असावी. उत्पन्नाचा दाखला दिनांक 31/3/2023 पावेतो वैध असलेला समक्ष प्राधिकार्यांनी दिलेला असावा.

सक्षम प्राधिकार्‍यांनी दिलेले अधिवास (डोमिसाईल ) प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. विद्यार्थ्याचा अधिवास नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील असावा.

नाशिक महानगरपालिका क्षेत्रात अधिवास असणारे विद्यार्थी पात्र नाहीत.

अनुसूचित जाती / जमाती या सामाजिक प्रवर्गाच्या विद्यार्थ्याकडे सक्षम प्राधिकार्‍यांनी दिलेला जातीचा दाखला असावा.

दिव्यांग विद्यार्थ्यांना किमान 40% दिव्यांगत्व असल्याचे समक्ष प्राधिकार्यांचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.

सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना निवड चाचणी परीक्षा अनिवार्य राहील तसेच सदर निवड चाचणी परीक्षेत उच्चतम् गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची निवड मर्यादित स्वरुपात करण्यात येईल.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

- Advertisment -

ताज्या बातम्या