Friday, May 23, 2025
Homeनगरअकरावी प्रवेश प्रक्रियेत पहिल्याच दिवशी गोंधळ

अकरावी प्रवेश प्रक्रियेत पहिल्याच दिवशी गोंधळ

संगमनेर |वार्ताहर| Sangamner

- Advertisement -

राज्यात अकरावी प्रवेश प्रक्रियेचा शुभारंभ सोमवारपासून झाला असला, तरी संगमनेर-अकोलेमधील विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशीच तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले. संकेतस्थळावर अर्ज भरताना वारंवार सर्व्हर डाऊन होत असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर उमटला आहे. विविध शाळांमधून दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सादर करत होते. मात्र, सकाळपासूनच संकेतस्थळावर तांत्रिक बिघाड निर्माण झाला. परिणामी अर्ज प्रक्रिया पूर्ण होत नव्हती, त्यामुळे अनेक विद्यार्थी व पालकांनी संताप व्यक्त केला. पालकाने सांगितले की, तांत्रिक अडचणींमुळे चार ते पाचवेळा अर्ज भरूनही सबमिट होत नव्हता.

शिक्षण विभागाने अशी व्यवस्था करणे अपेक्षित नव्हते. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांकडे मोबाईल किंवा इंटरनेटची सुविधा पुरेशी नसल्याने ते सायबर कॅफेंना गर्दी करत आहेत. मात्र, सर्व्हर डाऊनमुळे त्यांचा वेळ आणि पैसे वाया जात आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी शिक्षण विभागाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पालकांकडून होत आहे. संगमनेरमधील स्थानिक शैक्षणिक संस्थांनीही तांत्रिक अडचणी दूर करून प्रवेश प्रक्रिया पारदर्शक करण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, राज्यात अकरावीची प्रवेश प्रक्रिया शहरी ग्रामीण भागाबरोबर सर्वदूर ऑनलाईन करण्यात आली आहे. मुळातच ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी फार मोठ्या प्रमाणावर अडचणी येत नाहीत. शहरामध्ये अपेक्षित महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळावा म्हणून पालक गर्दी करत असतात. त्यामुळे त्याठिकाणी विद्यार्थ्यांची लुटमार मोठ्या प्रमाणात होते ही बाब लक्षात घेऊन शासनाने आरंभी महानगरापुरते असलेले ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया केली होती. त्याप्रमाणे आता राज्यातील जिल्ह्याचे ठिकाण व महत्त्वाचे तालुके अशा ठिकाणी ऑनलाईन प्रक्रिया केली तरी सुद्धा प्रवेश प्रक्रिया सुलभ होऊ शकेना, असे मत पालकांनी व्यक्त केले आहे.

ग्रामीण भागातील प्रक्रिया पूर्वीप्रमाणे सुरु ठेवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. राज्य शासनाने संकेतस्थळावर नोंदणी करून अकरावीला प्रवेश घेताना, प्रत्येक विद्यार्थ्यासाठी शंभर रुपये आकारले आहेत. यातून शासनाला कोट्यवधी रुपये जमा होणार आहेत. प्रवेश प्रक्रिया करणे ही शासनाची जबाबदारी असताना देखील शंभर रुपये घेऊन पालकांची लूट केली जात असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

‘अमृत भारत स्टेशन योजना’ : देवळाली कॅम्प रेल्वेस्थानकाचे लोकार्पण

0
नाशिकरोड/देवळाली कॅम्प । प्रतिनिधी Nashikroad / Deolali Camp मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील देवळालीसह, धुळे, लासलगाव, मूर्तीजापूर या नव्याने विकसित केलेल्या अमृत भारत रेल्वे स्थानकांचे लोकार्पण...