Friday, November 22, 2024
Homeशब्दगंध१२ पूर्णिमाचे महत्त्व

१२ पूर्णिमाचे महत्त्व

सरोजिनी गांजरे-लभाने (९४२२५६४०५८)

‘नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स

बुद्धमं सरणं गच्छामि

- Advertisement -

धम्मं सरणं गच्छामि

संघमं शरणम गच्छामि’

आषाढी पौर्णिमा (आसाळहो)

शाक्यमुनी भगवान तथागत सम्यक संबुद्धाच्या जीवनात आषाढी पौर्णिमेस अशा काही चार महत्त्वाच्या घटना घडल्या की ज्यांच्या चर्चेशिवाय बुद्ध गचरित्राला परिपूर्णता येणेच शक्य नाही.

१) पहिली घटना राणी महामायेचे स्वप्न – स्वप्न ही एक अशी वैयक्तिक अनुभूती आहे की ती प्रत्येक स्त्री-पुरुषाच्या जीवनात नेहमी येतच असते स्वप्नही शेवटी स्वप्नच असते ते खरे झालेच पाहिजे, असा कोणी आग्रह धरीत नाही .उलट सत्यात कधीही न उतरणार्‍या बाबींसाठी स्वप्न म्हणण्याची रीत रूढ आहे. राणी महामायेचे स्वप्न मात्र रूढ अर्थाने स्वप्न या बसणारे नव्हते, जेव्हा जेव्हा बौद्ध साहित्यात स्वप्न या विषयावर चर्चा सुरू होते. तेव्हा तेव्हा आषाढी पौर्णिमेच्या रात्री गाढ झोपेत राणी महामायेने चे स्वप्न पाहिले ते खरोखरच अपूर्ण होते. या स्वप्नात राणीने पाहिले की चारही दिशेने दूत येतात. राणीचा शाही पलंग राणी सह उचलून हिमालय पर्वताच्या हिमंवंत प्रदेशातील एक शाल वना जवळील अनुवादः नावाच्या सरोवरावर नेतांना सुंदर सुगंधी अशा फुलांनी बहरलेल्या एका विशाल शाल वृक्षा खाली ठेवतात. थोड्या वेळानंतर त्या चारही दूतांच्या पत्नी तेथे येतात. त्यांनी राणीस हळूच झोपेतून उठवून सुगंधी लेपाने सर्वांगास सजवून राणी स्नान घालतात स्नानानंतर सुंदर सुसज्जित वस्त्र देतात. त्यानंतर राणी स सुगंधी फुलांनी सुवासीक अत्तर यांनी असे काही सजवतात की राणी एका सुंदर वनकन्या सारखी दिसू लागत. काही वेळाने सहा दातांचं शुभ्र गजराज तेथे येतो. त्याने आपल्या सोंडेत श्वेत कमल पुष्पांची माळा धारण केलेली असते, राणीच्या भोवती तो तीन प्रदक्षिणा घालतो व नकळत राणीच्या उजव्या कुशीत प्रवेश करतो. नेमकी याच वेळी राणी स्वप्नातून जागी होते.

दुसर्‍या दिवशी सकाळी राणी महामायेने जे स्वप्न राजा शुद्ध ना सांगितले, तेव्हा त्यांनी स्वप्नाचा अर्थ लावण्यासाठी शम्म,ध्वज, लक्खन ,मंत्री कोण्डज ,भोज सुयाम आणि सुदत्त या ८ स्वप्न शास्त्रांना दरबारात बोलावून घेतले. त्यांना जेव्हा स्वप्नाचं सविस्तर वृत्तांत कथन करून या स्वप्न शास्त्रींना या राणीच्या स्वप्नाचा अर्थ विचारण्यात आला. सर्व एकूण झाल्यानंतर त्यांपैकी जो सर्वात वृद्धशास्त्री होता. त्याने राजास या स्वप्नाचा अर्थ सांगितला. तो म्हणाला राजन आपण स्वप्न संबंधी कसलीही चिंता करू नये निश्चिंत रहावे हे स्वप्न फारच सुखद असून याचा परिणाम अतिशय शुभ मंगलमय आहे .आपल्या घरी येईल राजपुत्र लवकरच जन्मास येणार आहे. या स्वप्नाच्या द्वारेराणी महामायेस या आषाढ पौर्णिमेच्या दिवशी गर्भधारणा झालेली आहे. म्हणूनच या पौर्णिमेला गर्भमंगलमय दिन म्हणतात.

२) दुसरी घटना गौतमाचा गृहत्याग – सिद्धार्थ गौतमाच्या वडिलांचे नाव शुद्धोधन शक्य वंशीय राजा सिद्धार्थ हे राजवंशी हे नाव असून त्यांचे गोत्र गौतम किंवा गौतम होतो ते सूर्यवंशी घराण्यातील प्रसिद्ध वाक वाकू कुळातील असून कपिलवस्तु नगरी चा राजा होय शुद्ध धनाची राजधानी कपिल वस्तू ही कपिलवस्तु नगरी भारत देशात उत्तर प्रदेशात वाराणसीच्या उत्तरेला १४० किलोमीटरवर हिमालय पर्वताच्या पायथ्यापासून सुमारे ६५ किलोमीटरवर रोहिणी नदीच्या काठावर वसलेली होती या राज्याची शासन व्यवस्थित संघ किंवा गणराज्य असे म्हणतात शेतक-यांच्या गणतंत्र राज्यात अनेक राजवंश होते ते आळीपाळीने राजसत्ता चालवित राजपुत्र सिद्धार्थाच्या जन्माच्या वेळी राज्यसत्ता उपभोगण्याचा माणूस सिद्धार्थाची पितात यांचा होता राजा शुद्धोदन आची सत्ता कपिल वस्तूवर होती तथापि कपिलवस्तु हे एक सोशल नरेश प्रसेनजित या राजाचे मांडलिक राज्य सोशल नरेश आपल्या राजसत्तेने काही कधी कर यांना वापरता येत नसत. कपिलवस्तुच्या शेजारी रामग्रामचे कोलिय यांचे राज्य होते. या दोन राज्यांमधून रोहिणी नावाची नदी वाहत असे, रोहिणी नदीचे पाणी शाक्य व व कोलिय हे दोघेही आपापल्या शेतीकरिता वापरीत नदीचे पाणी कोणी प्रथम घ्यावे व किती घ्यावे याबद्दल प्रत्येक सुगीच्या हंगामात त्यांचा वाद होत. असे हा वाद कायमचं बाईचा असेल तर तो युद्धाने स्मित व्हावा असा निर्णय शाक्य संघाने आमसभेत घेतला याच आमसभेत सिद्धार्थ गौतमाने असे घोषित केले की संघाच्या या निर्णयास माझा विरोध आहे शुद्धोधनाने हा प्रश्न सोडवता दोन्ही बाजूंकडील २=२ प्रतिनिधी निवडून यावेत आणि त्यांनी ५ वा प्रतिनिधी निवडावा व पंचांनी सामंजस्याने हा प्रश्न निकाली काढावा,, असे स्पष्ट मत सिद्धार्थाने मांडले. मत म्हणजे शाक्य संघाने घेतलेला निर्णयाला आव्हान होते. जो कोणी संघाच्या निर्णयाविरुद्ध वागतो व संघाचा आदेश मोडतो त्या संघ शासन आल्याशिवाय सोडत नसे संघाच्या शिक्षेची अंमलबजावणी निमूट पणे करणे हे संघाच्या प्रत्येक सभासदाचे आद्यकर्तव्य असेसंघाचा आदेश गौतमाने मोडला म्हणून त्यास शिक्षा दिली व त्या शिक्षेचे तीन पर्याय संघाने गौतमा समोर ठेवले हे पर्याय असे. १) सैन्यात दाखल होऊन युद्धात सामील होणे. २) देहांतशासन स्वीकारणे अथवा देश त्याग करणे. ३) कुटुंबाच्या सर्व मालमत्तेची जप्ती व सामाजिक बहिष्कार अस राजी होणे. यापैकी पहिला पर्याय तर गौतम आस मान्य होणे कदापि शक्य नव्हते कारण त्याच्या विचारात युद्ध विरोध ठासून भरलेला होता. तिसरा पर्यायही त्यास मान्य नव्हता कारण या निर्णयात कुटुंबाचा काहीही दोष नव्हता संघाच्या दृष्टीने दोष कोणाचा असेलच तर तो गौतमाचा होता. म्हणून दुसरा पर्याय गौतमा लागू होतो त्यातीलही पहिली शिक्षा सिद्धार्थ मान्य नव्हती कारण देहदंड त्यास दिला जातो जो देश द्रोहा सारखा गंभीर अपराध करतो. तेव्हा देह दंडाचा प्रश्नच उद्भवत नाही. ही राहिला पर्याय देश त्यागाचा त्यावर सिद्धार्थाने संघास असे सांगितले की, देशत्याग पर्याय स्वीकारण्यास मी स्वखुशीने केव्हाही तयार आहे सत्य व न्याय यापासून परावृत्त होणे यापेक्षा देश त्याग करण्याचा निर्णय केव्हाही चांगला.

पुढे राजपुत्र सिद्धार्थस देशत्याग करावा लागला ही वार्ता कोशल नरेश प्रसेनजित यास समजली. तर तो शाक्य संघास जाब विचारल्याशिवाय राहणार नाही अशी भीती सेनापतीस वाटत होती. सेनापतीच्या या शंकेश गौतमा जवळ उत्तर होते. तो म्हणाला मी परिव्रजा घेऊन देश सोडेन यामुळे कोशल नरेशास शंका सुद्धा आता येणार नाही. यावर सेनापतीने दुसरी एक शंका उभी केली. ती म्हणजे माता पिता आणि घरच्या सर्वांचे अनुमती घेतल्याशिवाय परिव्रजा घेता येत नाही. यावरही ही राजपुत्र गौतमाने मोठ्या धैर्याने ही शंकाही दूर केली पत्नी यशोधरा व त्याने राजाराणी कडून मोठ्या कष्टाने अनुमती मिळविली मातापित्यांनी दुःखी करणारे अंतकरणाने अनुमती दिली. त्याच बरोबर युवराज्ञी यशो धरेचे या वेळेचे चे विचार ऐकून राजपुत्र गौतम प्रभावित झाला यशोधरा म्हणाली आपला निर्णय योग्य आहे मीही तुमच्याबरोबर परिव्रजा घेतली असती पण पण आपल्या पाठीमागे बाळ राहुल ते संगोपन करण्याची जबाबदारी मज वर पडणार आहे आपण आपल्या सर्व प्रियजनांना सोडून परिव्राजक होत आहात. तेव्हा आपण असा एखादा जीवन मार्ग शोधून काढा की तो सकल मानवजातीला कल्याणकारी ठरेल हे ऐकून गौतम आज फारच समाधान वाटले. आपल्याला अशिष शूर धैर्यवान व उदात्त मनाची पत्नी मिळाल्याबद्दल गौतम स्वतःला भाग्यवान समजतो त्यांनी यशोधर इला पुत्र राहुल्या आणावयास सांगितले एक वेळ त्याच्याकडे पीतृत्वाच्या नजरेने पाहिले आणि त्याने तो महाल सोडला. तो दिवस होता सोमवार आषाढ पौर्णिमा इसपू ५३४ त्यावेळी गौतमाचे वय होते २९ वर्षाचे या गृह त्यागाच्या घटनेस गौतमाचे महाभिनिष्कमण असे म्हणतात.

३) तिसरी घटना पंच वर्गीय भिक्खूंची दीक्षा – भगवंतास संबोधी प्राप्त झाल्यानंतर ते धम्मज्ञान कोणाला सांगावे किंवा सांगू नये असा प्रश्न तथागत तास पडला संबोधी प्राप्त झाल्यानंतर दुसर्‍यांना आपल्या धम्माचा उपदेश द्यावा की आत्मकल्याण पुरताच तोच अमित ठेवावा असा विचार ते करू लागले या याला बुद्धांचा विषाद्योग असे म्हणतात.तथागता असे वाटते की, १) मला धम्माचे ज्ञान मिळाले हे खरे परंतु प्रत्येक सामान्य व्यक्तीला ते समजणे व त्याचे अनुकरण करणे कठीण आहे बुद्धिमान लोकांसाठी देखील ते अतिसूक्ष्म आहे.माणसाला आत्मा आणि परमात्मा यांच्या मोहजाला मधून निघणे कठीण आहे. त्याला रितीरिवाज रूढी आणि धार्मिक संस्कार यांच्या बंधनातून निघणे कठीण आहे.

किच्छेन मे अधिगतं हलं दानि पकासितुं

रागदोसपरेतेहि नायं धम्मो सुसंबुध्दो

परिसोतगामि निपुणं गंभिर दुद्दंस अणुं

रागरत्ता न दक्खन्ति तमोखन्धेन आवुटा ति..!

अर्थ – मोठ्या प्रयत्नाने या मार्गाचे ज्ञान मला झाले आहे. आता ती लोकांना सांगण्यात अर्थ दिसत नाही. कारण लोभाने आणि द्वेषाने भरलेले लोक हे जाणू शकणार नाहीत.

२) हा मार्ग लोक प्रवाहाच्या उलट जाणार आहे हा ज्ञान युक्त आहे. हा गंभीर आहे. हा दुर दिगम आहे आणि हा सूक्ष्म आहे. अज्ञानावर नाणे अच्छा नदीत व कामासक्त मनुष्यांना याचे ज्ञान होणार नाही. शेवटी तथागतांनी विचार केला.

सर्व जगात शांती प्राप्त व्हावी दुःखातून सर्वांची मुक्तता व्हावी हे तर आवश्यक आहे. तेव्हा या धम्माचा इतिहास उपदेश केला पाहिजे, असा विचार करून आपणास प्राप्त झालेल्या ज्ञानाचा इतरांस दम उपदेशात द्वारे तो देण्याचा निश्चय तथागतांनी केला. सर्वप्रथम हा धम्म कोणाला द्यावा असा विचार करता त्यांना सर्वप्रथम आलारकालाम यांची आठवण झाली तथागताच्या विद्वान शहाणा बुद्धिमान व शुद्ध चरणी होता परंतु आलारकालाम मृत्यू पावल्याचे त्यांना समजले त्यानंतर उदक रामउत्तराला धम्म उपदेश देण्याचा विचार त्यांनी केला. परंतु तोही ८ दिवसापूर्वीच मृत्यू पावल्याचे सांगण्यात आले.

निरंजना नदीच्या काठी सिद्धार्थ गौतमाच्या घोर तपश्चर्या कालावधीत जे पाच शिष्य त्यांच्याबरोबर होते परंतु सुजाताच्या ग्रहणा नंतर गौतमाने तपस्या व का या देशाच्या त्याग केला. त्यामुळे ते रागावून निघून गेले होते. त्यांना हा सद्दम सर्वप्रथम सांगावा हा विचार करून तथागत आणि त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा समजले की हल्ली ते वाराणसी येथे आहेत. त्यांनी भेट देण्यासाठी भगवान वाराणसी येथील सारणात जवळील मृग दाय गेले लांबूनच त्या पंचवर्गीय टभिक्षूंनी पाहिले की सिद्धार्थ आपल्याकडे येतोय. त्यांचा गौतमा वरचा राग अजून पुरता गेलेलं नव्हता अश्वजीत श्रमण म्हणाला हा तोच गौतम आहे. जो सुजाताची खीर खाऊन सोडून भ्रष्ट झाला आहे. आता परत इथे आला आहेत. त्यानंतर लगेच कौण्डिण्य म्हणाला, आपण त्याच प्रणाम करायचा नाही. उठून उभे राहून त्या सन्मान द्यायचं नाही. कश्यप म्हणाला त्यास बसण्यासाठी आसन द्यायची नाही. ही त्याचे चीवर सांभाळायचे नाही बाकीचे श्रमण महानाम व बद्रिक अथवा यांनी त्यांना समर्थन केले. त्यामुळे त्यांनी ठरविले की गौतमाचे स्वागत करायचे नाही, कारण त्या गौतम श्रमदानाने तपस्येचा मार्ग सोडून वैभव आणि विलास जीवनाचा अंगीकार केला आहे. त्यामुळे आपण तो आला म्हणजे, उभे राहायचे नाही . त्याचे आदरतिथ्य करायचे नाही. त्यांच्यासाठी बाजूला एक आसन ठेवून देऊ इच्छा असेल, तर तू त्यावर बसेल अन्यथा आला. तसा निघून जाईल बुद्धाने ज्या ५ परिव्राजकांना दीक्षित करायचे ठरवूनच त्यांचा शोध घेत इथपर्यंतचा प्रवास केला. होता ते येथे बसले होते तेथपर्यंत तथागत स्वतःहून संत पावले टाकत चालत गेले. तथागताचा जवळ येईपर्यंत त्यांचे स्वागत करण्याचा निश्चय करून निर्विकारपणे बसलेले ते ब्राह्मण श्रवण तेव्हा त्यांचा तो दृढ निश्चय विसरले कधी त्यांचा विरोध करून पडला हे त्यांचे त्यांनाही कळले नाही. भगवंताचे व्यक्तिमत्वच इतके प्रभावी होते, की त्यांचे प्रभावित होऊन ते चुंबकाच्या कडे जसे लोखंड आकर्षित व्हावे तसे ते सर्व प्रभावित झाले. त्यांचा आधीच गौतमाचा सत्कार न करण्याचा निश्चय असा गळून पडला. जसा वार्याच्या झोताने पिकलेला आंबा झाडावरून गळून पडावा ते सर्वच्या सर्व श्रम न तथागतांच्या स्वागतासाठी उठून कोणत्या क्षणी उभे राहिले…ज्या दिवशी तथागतांनी या पंच वर्गीय भिक्षूंना धम्मदीक्षा देऊ प्रजीत दिवस होता सोमवार आषाढ पौर्णिमा ५२८ आणि त्या पंचस्वर्गीय विक्खूनची नावे होती. अश्वजीत, कश्यप, महानाम आणि भद्रिक या आषाढ पौर्णिमेस सर्व बौद्ध जनता धम्मचक्र प्रवर्तन दिन या नावाने संबोधित.

४) चौथी घटना वर्षावास – पावसाळ्यात कोणा एका विहारात राहून धर्मोपदेश करणे. यासच वर्षावास असे म्हणतात की कोणी धम्माची शिकवण देतात देतात भिक्षा मागून चरितार्थ चालवावा असा दंडक होता. दोन भिक्खूंनी एकत्र न फिरता अलग अलग दिशेने धम्मप्रचार करावयाचा व एका गावी दोन दिवसांपेक्षा अधिक कधीच मुक्काम करायचा नाही. असा ही नियम तथागतांनी संघासाठी घालून दिलेला होता. पावसाळ्याच्या तीन महिन्याच्या कालावधीत मात्र कोणा एका मध्यवर्ती शहराच्या बुद्धविहारात भिकू ने मुक्काम करावयाचा व तेथे राहून धम्मदेसना करावयाचा प्रघात धम्मात आहे. पावसाळ्यातील मुक्काम म्हणजे वर्षावास असे म्हणतात. भगवंतांनी पंचवर्गीय भिक्खूंना प्रथम धम्मदीक्षा मसारनाथफ येथील मृगदाय वनत दिली. तो कालावधी पावसाळ्यातच होता. तेव्हा भगवंतांनी साजरा केलेला वर्षावास भगवंताचा व बौद्ध धम्माचा प्रथम वर्षावास या नावाने ओळखला जातो. वर्षावासाची सुरुवात आषाढ पौर्णिमेस होते, तर त्याची सांगता अश्विन पौर्णिमेस होते. भगवंतांनी साजरा केलेला वर्षावाचा प्रथम दिवस होता.आषाढ पौर्णिमा इ.स.पू. ५२८ त्यामुळे बौद्ध जनांमध्ये तथागतांच्या पावलावर पाऊल ठेवणारे आणि त्यांचे विचार जीवनामध्ये अंगीकारणारे बौद्धजन आजही या आषाढी पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या दिवसांमध्ये त्यांच्या नियमाचे पालन करण्याचा प्रयत्न करतात आणि पवित्र अशा या महिन्यांमध्ये चांगले विचार, चांगले आचार, आपल्या परिवारात, स्नेह जनात, आणण्याचा प्रयत्न सदोदित करीत असतात. अशा या आषाढ पौर्णिमेच्या सगळ्यांना मनोमन सदिच्छा!

– प्रकाशक – भदंत आर धम्मांआकुर थेरो

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या