Friday, January 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजCrime News: धक्कादायक! १२ वर्षाच्या मुलीवर तीन महिन्यात २०० पेक्षा जास्त पुरुषांचा...

Crime News: धक्कादायक! १२ वर्षाच्या मुलीवर तीन महिन्यात २०० पेक्षा जास्त पुरुषांचा लैंगिक अत्याचार; वसईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

मुंबई | Mumbai
मुंबई परिसरातून मानवी तस्करीचा अत्यंत भयानक प्रकार समोर आला आहे. नालासोपारातील नायगावमध्ये एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या सेक्स रॅकेटमधून एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली आहे. या अल्पवयीन पीडितेने एनजीओना दिलेल्या जबाबात धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. केवळ तीन महिन्यांत २०० हून अधिक पुरुषांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे पीडित मुलीने म्हटले आहे.

२६ जुलै रोजी मुंबईतील दोन स्वयंसेवी संस्था एक्सोडस रोड इंडिया फाउंडेशन आणि हार्मनी फाउंडेशन यांनी मीरा-भाईंदरच्या मानव तस्करी विरोधी पथकाच्या समन्वयाने मीरा-भाईंदर-विरार-वसईचे पोलिस आयुक्त निकेत कौशिक यांच्या देखरेखीखाली पोलिस निरीक्षक देविदास हंडोरे यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त बचाव मोहीम राबवली. यावेळी नायगाव (पूर्व) येथील एका इमारतीत छापा टाकण्यात आला होता. यावेळी पोलिस अधिकाऱ्यांना आढळले की, बांगलादेशातील एका १२ वर्षीय मुलीला वेश्याव्यवसायात ढकलण्यात आले होते. अधिकाऱ्यांनी तिची यशस्वीरित्या सुटका केली होती. या प्रकरणात आतापर्यंत दहा जणांना अटक करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

- Advertisement -

२०० हून अधिक पुरुषांनी लैंगिक शोषण केले
या घटनेसंदर्भात हार्मनी फाउंडेशनचे संस्थापक अब्राहम मथाई म्हणाले, ‘१२ वर्षीय चिमुकलीचे रिमांड होममध्ये काउन्सलिंग करण्यात आले आहे. तिला ताब्यात घेतल्यानंतर तिने सगळा प्रकार सांगितला. तिला गुजरातमधील नाडियाद येथे नेण्यात आले होते. नंतर तीन महिन्यांत २०० हून अधिक पुरूषांनी तिचे लैंगिक शोषण केले’. ती अद्याप किशोरावस्थेत पोहोचलेली नाही, तरीही देह व्यापारातील राक्षसांनी तिचे बालपण हिरावून घेतले.” शाळेच्या परीक्षेत नापास झाल्याने पालकांच्या भीतीने ही मुलगी घरातून पळून गेली होती. त्यानंतर तिच्याच गावातील ‘मीम’ नावाच्या एका महिलेने तिला आमिष दाखवून फसवले. तिला सीमेपलीकडून बेकायदेशीरपणे कोलकाता येथे आणण्यात आले. कोलकातामध्ये तिचे बनावट आधार कार्ड तयार करण्यात आले. त्यानंतर तिला विमानाने मुंबईत आणून नायगावमध्ये डांबून ठेवण्यात आले.

YouTube video player

तिच्या इच्छेविरुध्द वैश्याव्यवसायासाठी भाग पाडले
“नायगावमध्ये ती एका वृद्ध पुरूष आणि त्याच्या पत्नीसह ७ ते ८ मुलींसोबत राहिली होती. त्या पुरूषाने तिला इंजेक्शन दिले आणि तिच्यावर अत्याचार केला आणि तेव्हापासून तिला तिच्या संमतीशिवाय अनेक अज्ञात ग्राहकांना ऑफर करण्यात आली,”. डॉ. मथाई यांनी सांगितले की, “खालिद बापरी आणि त्याच्या साथीदारांच्या नेतृत्वाखालील तस्करी नेटवर्कद्वारे या अल्पवयीन मुलीला तिच्या इच्छेविरुद्ध वेश्याव्यवसायासाठी अनेक शहरांमध्ये वारंवार पाठवले जात होते.”

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

पासपोर्ट

Nashik News: परदेशगमन, शिक्षण, रोजगार, पर्यटनासाठी आठ वर्षात ‘एवढ्या’ नाशिककरांनी काढले...

0
नाशिक | प्रतिनिधीपरदेशगमन, शिक्षण, रोजगार व पर्यटनासाठी वाढलेल्या मागणीमुळे नाशिक शहरात पासपोर्टधारकांची (पारपत्र) संख्या सातत्याने वाढत आहे. गेल्या आठ वर्षांत (२०१८ ते २०२५) तब्बल...