Monday, November 18, 2024
Homeनाशिकदहा वर्षात १२५ कोटी आधारनोंदणी

दहा वर्षात १२५ कोटी आधारनोंदणी

नाशिक । प्रतिनिधी 

जगातील सर्वात मोठी बायोमेट्रिक ओळख प्रणाली मानल्या जाणाऱ्या आधार कार्डची संख्या गेल्या दहा वर्षात १२५ कोटींच्या वर पोहोचली आहे. आधार कार्ड जारी करणाऱ्या युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (युआयडीएआय) च्या  वतीने केलेल्या घोषणेत १२५ कोटींचे हे लक्ष्य दहा वर्षे तीन महिन्यात गाठण्यात आले असल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

12 अंकी ओळख क्रमांक असणारे आधार कार्ड हे सरकारने भारतीय नागरिकांना दिलेले ओळखपत्र आहे. नंदन निलेकणी यांना प्रथम युआयडीएआयचे अध्यक्ष केले गेले. त्यांच्या संकल्पनेतून देशातील नागरिकांना विशिष्ट सांकेतिक ओळख देण्यासाठी आधाराची योजना आणण्यात आली होती. 12 अंकी क्रमांक असेलेले आधार कार्ड देशात कोठेही  व्यक्तीची ओळख आणि पत्त्याचा पुरावा मानण्यात येत आहे. नवजात बालकांसाठी देखील आधार नोंदणी करणे आवश्यक बनले आहे.

आधार ही जगातील सर्वात मोठी बायोमेट्रिक आयडी प्रणाली मानली जाते. जागतिक बँकेचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ पॉल रोमर यांनी “जगातील सर्वात अत्याधुनिक आयडी प्रोग्राम” म्हणून आधारचे वर्णन केले आहे. युआयडीएआयच्या दोन डेटा सेंटरमध्ये आधारचा डेटाबेस ठेवण्यात आला आहे.

या दोन केंद्रांवर एकूण सात हजाराहून अधिक सर्व्हर आहेत. ही डेटाबेस केंद्रे औद्योगिक मॉडेल टाउनशिप (आयएमटी), मानेसर आणि बेंगलोर येथे आहेत. पूर्वी आधार ईकेवायसी  म्हणून  बँक खाते उघडण्यासाठी आणि मोबाइल सिम घेण्यासाठी वापरण्यात येत होते, परंतु आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ते ईकेवायसी म्हणून वापरले जाऊ शकत नाही. तथापि अद्याप इतर अनेक सेवांसाठी ते वापरले जात आहे.

या सेवांसाठी आधार आवश्यक 

पासपोर्ट जारी करण्यासाठी आधार क्रमांक अनिवार्य करण्यात आला आहे. याशिवाय बँकेत  जन धन खाते उघडणे, एलपीजी अनुदान, रेल्वेच्या तिकीट सवलती, डिजिटल लाइफ सर्टिफिकेटसाठी आधार आवश्यक आहे.  आधार कार्डशिवाय भविष्य निर्वाह निधी उपलब्ध होणार नाही तसेच डिजिटल लॉकरसाठी आधार आवश्यक आहे. मालमत्ता नोंदणी, विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती, आयकर विवरणासाठी आधार बंधनकारक आहे. 

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या