Wednesday, May 29, 2024
Homeमुख्य बातम्यामोठी बातमी! बारावीचा पेपर फुटला, प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल

मोठी बातमी! बारावीचा पेपर फुटला, प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल

बुलढाणा | Buldhana

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (Maharashtra State Boards of Secondary and Higher Secondary Education) बारावी बोर्डाच्या परीक्षा सध्या सुरू आहेत…

- Advertisement -

या परीक्षा पारदर्शक आणि गुणवत्तेवर आधारित व्हाव्यात यासाठी बोर्डाने कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबविले आहे. मात्र, परीक्षेत बोर्डाकडून वारंवार होणाऱ्या चुका काही कमी होताना दिसत नाहीत.

कविता राऊत, दत्तू भोकनळ यांसारख्या खेळाडूंना…; भुजबळांच्या लक्षवेधी सूचनेवर महाजनांचे उत्तर

इंग्रजी विषयाच्या पहिल्याच प्रश्नपत्रिकेत चक्क उत्तर छापून आल्यानंतर राज्यभरात याची चर्चा झाली होती. त्यानंतर बीड येथील एका परीक्षा केंद्रात पेपर देण्यासाठी आलेल्या मराठी माध्यमाच्या (Marathi medium) विद्यार्थ्यांना चक्क इंग्रजीमधून प्रश्नपत्रिका मिळाली. ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला. अशा घटना घडल्या असताना आता बुलढाणा येथून एक धक्कादायक बाब समोर आली आहे.

भाजप आमदाराच्या पुत्राला ४० लाखांची लाच घेताना पकडलं; घरात सापडलं ६ कोटींचं घबाड

बुलढाण्यात बारावीच्या परीक्षेदरम्यान गणित विषयाचा पेपर (Mathematics paper) फुटला असल्याचे बोलले जात आहे. या पेपरची प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे हे कृत्य नेमके कुणी आणि कसे केले? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या पेपरफुटीनंतर आता बोर्ड याबाबत काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

तुरुंगात टाकून झालं आता फासावर लटकवा; राऊतांचे-शिंदे फडणवीस सरकारला आव्हान

हाती आलेल्या माहितीनुसार, आज बारावीचा गणिताचा पेपर होता. सिंदखेडराजा (Sindkhedaraja) येथील एका परीक्षा केंद्रावर गणिताच्या पेपर संदर्भात ही बाब घडली. परीक्षेदरम्यान हा पेपर समाज माध्यमात व्हायरल करण्यात आला होता. परीक्षा केंद्रावर (Examination Centre) मोबाईलला बंदी असतानाही पेपर सोशल मीडियावर व्हायरल कसा झाला, याबद्दल प्रश्न उपस्थित केला जात आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

दरम्यान, 10 वी आणि 12 वीची परीक्षा ‘कॉपीमुक्त’ व्हावी यासाठी शिक्षण (Education) विभागाकडून अभियान राबविले जात असले तरी वारंवार होणाऱ्या चुका ह्या बोर्डाच्या कॉपीमुक्तीला ठेंगा दाखवणाऱ्या ठरल्या आहेत, असे बोलले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या