Saturday, May 4, 2024
Homeनाशिकऑल द बेस्ट! उद्यापासून बारावीची फेरपरीक्षा

ऑल द बेस्ट! उद्यापासून बारावीची फेरपरीक्षा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

करोनामुळे (Corona) बारावीची मुख्य परीक्षा (12th Exam) रद्द झाल्यानंतर अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल (Result) जाहीर झाला…

- Advertisement -

त्यानंतर अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसह जुन्या अभ्यासक्रमानुसार अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची आज दि. १६ सप्टेंबरपासून विभागातील २९ केंद्रावर ऑफलाइन स्वरुपात परीक्षा घेतली जाणार आहे.

त्यासाठी ७३८ विद्यार्थी प्रविष्ठ झाले आहेत. करोनापासून मंडळातर्फे घेण्यात येणारी ही पहिलीच ऑफलाइन लेखी परीक्षा आहे. अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल जाहीर झाल्यावरही नाशिक विभागातून (Nashik Division) काही विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होऊ न शकल्याने त्यांचे निकाल प्रलंबित आहेत.

Visual Story : बिग बॉस फेम सिद्धार्थ शुक्लाचा जीवनप्रवास तुम्हाला माहीत आहे का?

त्यामुळे या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा (Re-examination) घेण्याचा निर्णय झाला आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेत १ लाख ५१ हजार ७५४ पैकी १ लाख ५१ हजार १७३ विद्यार्थी अंतर्गत मूल्यमापनाच्या जोरावर उत्तीर्ण झाले आहेत.

उर्वरित विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा लेखी स्वरुपात होणार आहेत. त्या वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा १६ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. या परीक्षेसाठी नाशिक जिल्ह्यातून ५०८, धुळ्यातून ५६ , जळगाव १३२ आणि नंदूरबारमधून ४२ असे एकूण ७३८ विद्यार्थी प्रविष्ठ झाले आहेत.

Video : राजमहालात विराजले ‘इकोफ्रेंडली बाप्पा’

व्यवसाय अभ्यासक्रम घेऊन बारावीची परीक्षा १६ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत होईल. तत्पूर्वी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा १५ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत होणार असल्याचे राज्य मंडळाने सांगितले.

पुरवणी परीक्षेला कमी विद्यार्थी प्रविष्ठ असल्याने करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित नियम पाळून या विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रांवर लेखी परीक्षा (Written Exam) घेणे शक्य आहे. त्यानुसार नियोजन पूर्ण झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या