नागपूर | वृत्तसंस्था Nagpur
मुंबई येथील गेट वे इंडिया हून एलिफंटाकडे जाताना ‘नीलकमल’ बोट उलटली. नौदलाची स्पीड बोट नीलकमल बोटीवर जाऊन आदळल्याने हा अपघात झाला. या अतिशय दुर्दैवी घटनेत एकूण १३ जणांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनाग्रस्तांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत जाहीर करण्यात आली आहे .
- Advertisement -
या घटनेत मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत देण्याची घोषणाही फडणवीस यांनी केली. या दुर्घटना प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल अशी सूचनाही फडणवीस यांनी दिली.यामध्ये ३ नौदलाचे कर्मचारी आहे. तर १० नागरिक आहेत त्यांना मृतघोषित केलं आहे. जखमींना नौदलाच्या रुग्णालयात दाखल केलं आहे असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले आहे.