Sunday, May 19, 2024
Homeनंदुरबारनंदुरबार शहरातील १३ डीजे व डॉल्बी सिस्टीम स्वेच्छेने पोलीसांकडे सुपूर्द

नंदुरबार शहरातील १३ डीजे व डॉल्बी सिस्टीम स्वेच्छेने पोलीसांकडे सुपूर्द

नंदुरबार । Nandurbar । प्रतिनिधी-

गणेशोत्सव काळात डी.जे. व डॉल्बी साऊंड सिस्टीम न वाजविता पारंपारिक वाद्य वाजवावे असे आवाहन नंदुरबार जिल्हा पोलीस दलामार्फत करण्यात आले होते. त्यानुसार डी.जे. व डॉल्बी असोसिएशनच्या पुढाकाराने नंदुरबार शहरातील 13 डी.जे. व डॉल्बी सिस्टिम स्वेच्छेने नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडे जमा केले आहेत.

- Advertisement -

नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी डी.जे. व डॉल्बी सिस्टिमचा वापरावर बंदी घालण्यात आलेली आहे. गणेशोत्सव काळात डी.जे. व डॉल्बी साऊंड सिस्टीम न वाजविता पारंपारिक वाद्य वाजवावे. डी.जे. व डॉल्बीचा वापर केल्यास संबंधीतांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी दिला होता. या आवाहनाला नंदुरबार शहरातील डी.जे. व डॉल्बी असोसिएशने सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच नंदुरबार शहरातील 13 डी.जे. व डॉल्बी सिस्टिम वाहनासह नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे स्वेच्छेने जमा केले. तसेच वाहनांच्या चाव्या नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांचेकडे डी.जे. व डॉल्बी असोसिएशनचे अध्यक्ष पंडीत माळी यांनी सुपुर्त केलेल्या आहेत.

यावेळी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, उपअधीक्षक सचिन हिरे, पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, तालुका पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, डी.जे. व डॉल्बी असोसिएशनचे अध्यक्ष पंडित माळी, उपाध्यक्ष किरण बडगुजर, सचिव राकेश कापडे, मातोश्री साऊंडचे मालक योगेश बारी, राजज्योती साऊंडचे मालक धिरज कुंवर, शिव मल्हार साऊंडचे मालक गणेश सुळ, एनडी साऊंडचे मालक भुषण कोळी, समर्थ साऊंडचे मालक वरुण चव्हाण, पवन साऊंडचे मालक पवन कोकणी, माऊली साऊंडचे मालक नितीन कुंभार, मारुती राया साऊंडचे मालक घारु कोळी, वैष्णवी साऊंडचे मालक संकेत भोईटे, साई समर्थ साऊंडचे मालक निलेश मराठे, साई सरकार साऊंडचे मालक शैलेश मराठे, रिध्द्ी सिध्द्ी साऊंडचे मालक खंडु माळी, विघ्नहर्ता साऊंडचे मालक बंटी जगताप, मंगलमुर्ती साऊंडचे मालक राहुल चौधरी इत्यादी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या