येवला | प्रतिनिधी Yeola
येवला नगरपरिषद प्रभाग आरक्षण सोडत प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरपालिका सभागृहात आज, काढण्यात आली. २६ जागांपैकी १३ जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी २ तर अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी १ जागा आरक्षित झाली आहे.
येवला नगरपरिषद नगराध्यक्ष पद आरक्षण सोडतीत नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी यापूर्वी आरक्षित झालेले आहे. आज, प्रभाग आरक्षण सोडत काढण्यात आली. प्रारंभी मुख्याधिकारी तुषार आहेर यांनी प्रभाग व काढण्यात येणारे आरक्षण याबाबत माहिती दिली. नगरपरिषदेचे १३ प्रभाग असून सदस्यसंख्या २६ आहे. यात १३ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत.
लोकसंख्येच्या प्रमाणात प्रभाग क्रमांक १२ व ६ मध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी २ (यात महिला १) जागा (प्रत्येकी एक), प्रभाग क्रमांक १३ मध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी १ (गेल्या निवडणुकीत महिला आरक्षण असल्याने यंदा खुले) जागा आरक्षित करण्यात आली. तर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी उर्वरीत प्रभागातून ७ जागा (यात महिला ४) सोडत व महिला आरक्षण सोडत स्वामी मुक्तानंद विद्यालयातील विद्यार्थी उत्कर्षा नवनाथ पोळ, प्रणव बाबुलाल आवणकर यांचे हस्ते काढण्यात आली.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) शहराध्यक्ष दिपक लोणारी, गटनेते प्रविण बनकर, प्रवक्ते राजेश भांडगे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) शहराध्यक्ष योगेश सोनवणे, शिवसेना (एकनाथ शिंदे) शहर प्रमुख अतुल घटे, काँग्रेस शहराध्यक्ष मंगलसिंग परदेशी, दत्त्ता निकम, संतोष परदेशी, शफीक शेख, रिजवान शेख, झामभाऊ जावळे, संदीप मोरे, उपमुख्य अधिकारी चंद्रकांत भोये, अस्थापना प्रमुख बाळासाहेब पारधी, कर निरीक्षक रोहित पगार, भांडार प्रमुख किरण अहिरे, काकासाहेब शिरसाट, संगणक अभियंता सुरेंद्र गांगुर्डे आदींसह राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, परिषद कर्मचारी उपस्थित होते.
प्रभाग क्रमांक निहाय आरक्षण
१) अ नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब सर्वसाधारण (महिला),
२) अ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), ब सर्वसाधारण,
३) अ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), ब सर्वसाधारण,
४) अ सर्वसाधारण (महिला), ब सर्वसाधारण,
५) अ सर्वसाधारण (महिला), ब सर्वसाधारण,
६) अ अनुसूचित जाती, ब सर्वसाधारण (महिला),
७) अ नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब सर्वसाधारण (महिला),
८) अ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), ब सर्वसाधारण,
९) अ नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब सर्वसाधारण (महिला),
१०) अ सर्वसाधारण (महिला), ब सर्वसाधारण,
११) अ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), ब सर्वसाधारण,
१२) अ अनुसूचित जाती (महिला), ब सर्वसाधारण,
१३) अ अनुसूचित जमाती, ब सर्वसाधारण (महिला)





