Sunday, May 19, 2024
Homeदेश विदेशBus Accident : ब्रेक फेल झाल्याने बसचा भीषण अपघात; १३ प्रवाशांचा मृत्यू,...

Bus Accident : ब्रेक फेल झाल्याने बसचा भीषण अपघात; १३ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

पाकिस्तानच्या (Pakistan) पंजाब प्रांतात (Province of Punjab) शनिवारी (दि.१७) रोजी रात्रीच्या सुमारास बसचा भीषण अपघात (Bus Accident) झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात १३ प्रवाशांचा मृत्यू (Death) झाला असून २४ हून अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे…

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ही बस इस्लामाबादहून लाहोरला (Islamabad to Lahore) जात होती. त्यावेळी इस्लामाबाद-लाहोर महामार्गावरील कल्लर कहरजवळ (Kallar Kahar) या बसचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात असणारी ही बस डिव्हायडरवर आदळून महामार्गावर उलटली.

ठाकरे गटाला धक्का! आणखी एक आमदार नॉट रिचेबल, शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा

हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातामध्ये बसचे मोठे नुकसान झाले असून अपघातात १३ प्रवाशांचा मृत्यू (Passenger Deaths) झाला. यात पाच महिला आणि तीन मुलांचा समावेश आहे. तर २४ हून अधिक जण जखमी झाले असून त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

आमदार मनिषा कायंदे शिंदे गटाच्या वाटेवर; संजय राऊत म्हणतात, “स्वार्थी लोक ओळखण्यात…”

तसेच अपघाताची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग आणि मोटरवे पोलिसांनी (Motorway Police) घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले. तर जखमींमधील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलले जात असून अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये जमीन हादरली ; २४ तासांत सहा वेळा भुकंपाचे धक्के

दरम्यान, याअगोदर सुद्धा फेब्रुवारीमध्ये कल्लर कहरजवळ बस दरीत कोसळून (Bus Fell into the Valley) अपघात झाला होता. त्यावेळी या अपघातामध्ये महिला आणि लहान मुलांसह १४ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तर ६४ जण जखमी झाले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्याचठिकाणी अपघात झाला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

- Advertisment -

ताज्या बातम्या