नाशिक | प्रतिनिधी Nashik
नवीन नाशकातील सात्विक राहुल निरगुडे या १३ वर्षीय बालकाने दोरी उड्यांमध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करून नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
सात्विकने यापूर्वी एशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचा पुरस्कार पटकावला आहे. आता त्याने दोरी उड्या या स्पर्धेमध्ये पुर्वीचे २३३ उड्यांचे रेकॉर्ड मोडत एका मिनिटांत २३९ उड्या मारत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदविले.
सात्विकला त्याची आई अश्विनी वडील राहुल निरगुडे यांच्यासह कुटुंबातील सर्वांनी प्रोत्साहन दिले.त्याच्या या यशाबाबत इस्पलीयर शाळेचे डायरेक्टर सचिन जोशी, डॉ.मुस्तफा टोपीवाले, फिटनेस कोच विश्वास जमदाडे,डॉ.दिपाली भोसले जमदाडे,कालिका मंदिर संस्थानचे अध्यक्ष अण्णा पाटील,तन्मय कर्णिक,कोल्हापूर येथील प्रणव भोपळे,सचिन माळोदे यांच्यासह रोटरी क्लब ऑफ नाशिकरोड यांचे सहकार्य लाभले.सात्विकचे शालेय मित्र वीर व रोहन यांनी देखील त्याला प्रोत्साहन दिले.