Friday, September 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : नाशिकमध्ये १३० वर्षांपुर्वीची जुनी रहाड सापडली

Nashik News : नाशिकमध्ये १३० वर्षांपुर्वीची जुनी रहाड सापडली

- Advertisement -

नाशिक | प्रतिनिधी Nashik

गेल्या ५०–६० वर्षांत नाशिककरांना पाच रहाडी परिचित होत्या; मात्र रंगपंचमीच्या तीन दिवस आधी मेनरोडवरील राजेबहाद्दर लेनमध्ये सुमारे १३० वर्षांपूर्वीची आणखी एक जुनी रहाड सापडली. त्यामुळे शहरातील रहाडींची संख्या आता नऊवर पोहोचली आहे.

पेशवेकालीन काळात नाशिकमध्ये रंगोत्सवाची अनोखी परंपरा रुजली.सुमारे १२ फूट खोल दगडी हौदांमध्ये फुले, पाने, नैसर्गिक रंग आणि आयुर्वेदिक औषधी मिसळून रंग तयार केला जातो. या रंगात डुबकी मारल्यास त्वचारोग टळतात, अशी धारणा असून तरुणाई मोठ्या उत्साहात सहभागी होते.

दोन वर्षांपूर्वी स्मार्ट सिटीच्या कामादरम्यान मधली होळी परिसरातही एक रहाड सापडली होती. नागरिकांच्या मागणीनंतर ती जतन करण्यात आली. यंदा नव्याने सापडलेल्या रहाडीमुळे उत्साह वाढला असून पंचवटी, शनि चौक, दंडे हनुमान चौक, तिवंधा चौक, दिल्ली दरवाजा आणि जुनी तांबट गल्ली येथेही रंगोत्सव जल्लोषात साजरा होणार आहे..

ताज्या बातम्या

Nashik News : नशामुक्तीसाठी जनसहभागातून व्यापक चळवळ उभी करूया – राज्यमंत्री...

0
नाशिक, दि. 4 सप्टेंबर (जिमाका वृत्तसेवा) : Nashik अमली पदार्थांच्या विळख्याविरोधात केवळ शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून लढा देणे पुरेसे नसून या अभियानात समाजातील प्रत्येक घटकाचा सक्रिय...