धुळे – Dhule – प्रतिनिधी :
जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढतच असून रूग्ण संख्या तीन हजारा जवळ पोहोचली आहे. आज एकाच दिवशी तब्बल 133 पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. त्यात धुळे शहरातील 40, धुळे तालुक्यातील 42, शिरपूर 27, शिंदखेडा तालुक्यातील 18 व साक्री तालुक्यातील 6 रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकुण रूग्ण संख्या 2 हजार 993 एवढी झाली आहे.
सायंकाळी सात वाजता जिल्हा रुग्णालयातील 93 अहवालांपैकी 28 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात जवाहर सोसायटी साक्री रोड 2, प्रमोद नगर 1, रामचंद्र नगर 2, दह्याने 1, रावळवाडी 1, वेल्हाने 7, मोराणे 3, मुकटी 4, वडजाई रोड 1, जुने धुळे 1, बोराडी 1, सोनगीर 1, वार कुंडाने 1, जीटीपी देवपूर 1, सुरतवाला बिल्डींग जवळील एका रूग्णाचा समावेश आहे.
जिल्हा रुग्णालयातील रॅपिड अँटीजन टेस्ट केलेल्या 66 अहवालांपैकी 16 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. विंचूर 2, कुसुंबा 8, सोनगीर 4, दहिवेलमधील दोन रूग्ण आहेत.
दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयातील 58 अहवालांपैकी 18 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात पार्श्वनाथ नगर 1, रावळ नगर 1, भतवाल टॉकीज 3, चिमठाणे 1, सुलवाडे 1, डाबरी 2, अशोक नगर 2, गांधी चौक 3, हुडको कॉलनी 1, सातारा 1, देशमुख नगर 1, जैन कॉलनीतील एक रूग्ण आहे.
तसेच शिरपूर उपजिल्हा रुग्णालयातील 93 अहवालांपैकी 26 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. मांडळ शिवार 1, वाडी बु 1, शिंगावे 1, विद्याविहार कॉलनी 1, थाळनेर 3, जातोडे 1, भोई गल्ली 1, नवे लोंढरे 3, वाडी 2, राजपूत वाडा 2, अजनाड 2, बालाजी नगर 1, बोराडी 1 व शिरपूरातील सहा रूग्णांचा समाावेश आहे.
महापालिका पॉलिकेक्निक सीसीसी केंद्रातील 29 अहवालांपैकी 8 अहवाल पॉझटिव्ह आले आहे. त्यात गल्ली नंबर 6 – 2, अजयनगर 2, संतोषी माता 1, कुमार नगरातील तीन रूग्ण आहेत. तसेच भाडणे ता.साक्री येथील सीसीसी केंद्रातील 44 अहवालांपैकी 4 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. कासारे 1, गोपाळ नगर पिंपळनेर 2, निजामपूरातील एक रूग्णा आहे.
खाजगी लॅबमधील 74 अहवालांपैकी 33 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. बोस्टन कॉम्पुटरजवळ मालेगावरोड 1, नवभारत चौक 1, अग्रवाल नगर 1, पंचायत समितीमागे वाडीभोकर रोड 5, अग्रसेन कॉलनी देवपूर 1, कुमार नगर 1, फॉरेस्ट कॉलनी नगावबारी 1, मोगलाई 2, सातपुडा शाळेजवळ 1, नागाई कॉलनी 1, सैनिक कॉलनी 1, मोहाडी 1, शिव सागर कॉलनी 4, सुशीनाला विटभट्टी 1, आग्रा रोड 1, फागणे 1, वेल्हाणे 1, कावठी 1, बेहेड 1, जखाने 1, वलवाडी 1, मालपुर 1, शिरुड 1, फागणे 1 व मुकटीतील एका रूग्णाचा समावेश आहे. जिल्हाची एकूण रूग्ण संख्या 2 हजार 993 वर पोहोचली आहे.