Thursday, June 13, 2024
Homeनगरशिर्डीत पदवी अथवा त्यापेक्षा अधिक शिक्षण असलेले 14 उमेदवार

शिर्डीत पदवी अथवा त्यापेक्षा अधिक शिक्षण असलेले 14 उमेदवार

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

- Advertisement -

कधीकाळी लोकसभेत अशिक्षित उमेदवारही रिंगणात असत परंतु आता शिक्षणाच्या प्रसारामुळे पदवीधरांची संख्या वाढलेली असून शिर्डी लोकसभा मतदारसंघातील एकूण 20 उमेदवारांपैकी 14 उमेदवारांनी पदवी अथवा त्यापेक्षा अधिक शिक्षण घेतलेले आहे. दहावी व त्यापेक्षा कमी शिक्षण घेतलेले चौघे उमेदवार आहेत. तर दहावी ते बारावी पर्यंत शिक्षण झालेले दोन उमेदवार आहेत. उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांवरून त्यांची शैक्षणिक माहिती दिसून आली आहे.

सर्वात कमी इयत्ता सातवी शिक्षण अपक्ष उमेदवार भाऊसाहेब रामनाथ वाकचौरे यांचे आहे तर संख्येने सर्वाधिक पदव्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार भाऊसाहेब राजाराम वाकचौरे यांच्याकडे आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार भाऊसाहेब राजाराम वाकचौरे यांचे प्रतिज्ञापत्रात त्यांचे शिक्षण बी.कॉम, बी.ए, एल.एल.बी, डी.डी.एल अ‍ॅण्ड एल.डब्ल्यू, जी.डी.सी.ए व डी.एड. इतके असल्याचे नमूद केले आहे. शिवसेनेचे उमेदवार सदाशिव किसन लोखंडे यांचे शिक्षण एसएस्सी इतके झालेले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा प्रेमानंद रुपवते यांचे शिक्षण एम.ए. (सोशल वर्क) इतके झालेले आहे.

बहुजन समाज पक्षाचे उमेदवार रामचंद्र नामदेव जाधव यांचे शिक्षण एम.ए. बी.एड. आहे. समता पार्टीचे भरत संभाजी भोसले यांचे शिक्षण एच.एस.सी (बारावी) इतके आहे. बहुजन भारत पार्टीचे उमेदवार अ‍ॅड. नितीन दादाहरी पोळ याचे शिक्षण एम.ए, एल.एल.बी इतके आहे तर राष्ट्रीय जनक्रांती पार्टीचे उमेदवार राजेंद्र रत्नाकर वाघमारे यांचे शिक्षण बी.ए. इतके आहे. अपक्ष उमेदवारांमध्ये विजयराव गोविंदराव खाजेकर यांचे शिक्षण बी.एस्सी, एल.एल.बी इतके आहे. अभिजीत अशोकराव पोटे (बी.ए), रवींद्र कल्लाय्या स्वामी (बी.ए, एल.एल.बी), अशोक रामचंद्र आल्हाट (बी.ए), नचिकेत रघुनाथ खरात (एम.एस.डब्ल्यू), प्रशांत वसंत निकम (एम.ए), गंगाधर राजाराम कदम (बीएस्सी अ‍ॅग्री), संजय पोपट भालेराव (एसएस्सी), सतीश भिमा पवार (11वी), अ‍ॅड. सिद्धार्थ दीपक बोधक (बी.एस.एल. एल.एल.बी), गोरक्ष तान्हाजी बागुल (एमएस्सी अ‍ॅग्री), चंद्रकांत संभाजी दोंदे (एस.एस.सी. आयटीआय).

- Advertisment -

ताज्या बातम्या