Friday, May 24, 2024
Homeनाशिकतारुखेडलेतील शेतकऱ्याच्या कोथिंबिरीला सोन्याचा भाव; पाच एकरमधील शेतमालाला १४ लाखांची बोली

तारुखेडलेतील शेतकऱ्याच्या कोथिंबिरीला सोन्याचा भाव; पाच एकरमधील शेतमालाला १४ लाखांची बोली

निफाड | प्रतिनिधी | Niphad

तालुक्यातील तारुखेडले येथील शेतकऱ्याच्या पाच एकरमधील कोथिंबीरीला सोन्याचा भाव मिळाला आहे. नाशिक येथील व्यापाऱ्याने चक्क १४ लाख रुपयांची बोली लावली असून, ५१ हजार रुपये इसार देत उर्वरित रकमेचा धनादेश दिला आहे….

- Advertisement -

याबाबत माहिती अशी की, तारुखेडले (ता. निफाड) येथील शेतकरी ज्ञानेश्वर रामनाथ शिंदे यांनी आपल्या पाच एकर क्षेत्रात कोथिंबिरीचे पिक घेतले. सदर कोथिंबीर नाशिक येथील व्यापारी सुनील एमडी यांनी १४ लाख एक हजार रुपयांना खरेदी केली. व्यवहार झाल्यानंतर तत्काळ ५१ हजार रुपये इसार दिला. तर उर्वरित रकमेचा धनादेश दिला.

जिल्हा परिषदेच्या ‘इतक्या’ शाळांची दुरुस्ती करणार

त्यामुळे ज्ञानेश्वर शिंदे यांच्या मेहनतीला फळ मिळाले आहे. ज्ञानेश्वर शिंदे यांनी ३ जून रोजी कोथिंबीर बियाणे टाकल्यानंतर अवघ्या ४० दिवसांत पिक घेतले. या पिकासाठी शिंदे यांना शेत तयार करण्यासाठी १५ हजार रुपये, शेत बांधण्यासाठी ७ हजार ५०० रुपये, ६० किलो बियाण्यासाठी २१ हजार रुपये, मजुरी २७ हजार ५०० रूपये, औषध फवारणीसाठी १० हजार, रासायनिक खतांसाठी १८ हजार ५०० रुपये याप्रमाणे ९९ हजार ५०० रुपये खर्च आला. खर्च वजा जाता शिंदे यांना १३ लाख १ हजार ५०० रुपये निव्वळ नफा मिळाला.

राज ठाकरे यांचा कार्यकर्त्यांना संदेश ; म्हणाले, तडजोड करावी..

मेहनतीला फळ मिळाल्याचा आनंद

मी दरवर्षी आपल्या शेतात कोथिंबिरीचे पिक घेत असतो. त्यातून चांगले उत्पन्न मिळते. यावर्षी तर आपल्या कष्टाचे चीज झाले. पाच एकर शेतातील कोथिंबिरीला १४ लाख १ हजार रुपये मिळाल्याने कष्टाचे चीज झाले.

– ज्ञानेश्वर शिंदे, शेतकरी, तारुखेडले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

- Advertisment -

ताज्या बातम्या