Friday, May 3, 2024
Homeनाशिकदाभाडीत करोनाचा रुग्ण आढळल्याने खळबळ; सात पोलिसांसह मालेगावात १४ पाॅझिटिव्ह

दाभाडीत करोनाचा रुग्ण आढळल्याने खळबळ; सात पोलिसांसह मालेगावात १४ पाॅझिटिव्ह

मालेगाव | प्रतिनिधी

मालेगाव शहरात आणखी १४ रुग्ण वाढल्यामुळे मालेगावातील रुग्णसंख्या आता २९८ वर पोहोचली आहे. आज मालेगावात वाढलेल्या रुग्णांमध्ये सात पोलीस आणि एका तृतीय पंथीयाचा समावेश आहे. तर मालेगाव शहरातून दाभाडीत करोनाने शिरकाव केल्यामुळे खळबळ उडाली आहे. मालेगाव मध्य मतदारसंघात करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली असताना आता बाह्य मतदारसंघातही करोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

आज सकाळी नाशिक शहरात ७ तर ग्रामीणमध्ये ५ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. आज संपूर्ण नाशिक जिल्ह्यात ३६ रुग्ण वाढल्यामुळे करोना बाधित रुग्णांची जिल्ह्यातील संख्या आता ३३३ वर जाऊन पोहोचली आहे.

दाभाडीत आढळून आलेला रुग्ण कोणाच्या संपर्कात आला असावा याबाबत आरोग्य यंत्रणा तपास करत आहे. या रुग्णाचे वय साधारण ३३ वर्ष असल्याचे समजते.

दुसरीकडे मालेगाव शहरात आज चार पोलीस, नियंत्रण कक्षाचे दोघे पोलीस आणि एका अमरावती येथील एसआरपीएफ जवान असे एकूण सात पोलिसांचे अहवाल बाधित आढळून आले आहेत.

इतर इतर रुग्णांमध्ये एका कुंभार वाड्यातील २८ वर्षीय युवकाचा, मोहम्मद अली रोड येथील दोघे आणि अन्सारगंज येथील एक महिला तर योगायोग मंगल कायालय परिसरातील १८ वर्षीय तृतीय पंथीय आणि एका ५० वर्षीय महिलाला करोनाची बाधा झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या