नाशिक | शैलेंद्र तनपुरे – दै. ‘देशदूत’ – संपादक
दिवाळी हा प्रकाशाचा, आनंदाचा आणि उत्साहाचा सण. पण अलीकडच्या काही वर्षांत या सणाचे स्वरूप बदलले आहे. आनंद साजरा करण्याच्या गडबडीत आपण निसर्गाला आणि पर्यायाने स्वतःच्याच आरोग्याला किती विनाशाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले आहे, याची जाणीव आता दिवसागणिक अधिक प्रखरपणे होत आहे. अलीकडेच आलेल्या एका जागतिक अहवालाने डोळे उघडणारे वास्तव समोर आणले आहे. जगातील सर्वाधिक प्रदूषित १०० शहरांपैकी तब्बल ९३ शहरे एकट्या भारतातील आहेत आणि दुर्दैवाने यामध्ये आपल्या नाशिक शहराचाही समावेश आहे. यावर्षी दिवाळीत हवेची गुणवत्ता ज्या पातळीवर घसरली, तिने केवळ धोयाची पातळी ओलांडली नाही, तर मानवी अस्तित्वापुढे मोठेच प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
दिवाळीत फटायांच्या आतषबाजीचा मोठा फटका हवेच्या गुणवत्तेला (अटख) बसतो. दिवाळीपूर्वी ज्या नाशिक शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक साधारण ११५ ते १५० च्या दरम्यान होता, तो लक्ष्मीपूजनाच्या काळात अचानक वाढून २३४ ते ३५३ पर्यंत पोहोचला. काही स्थानिक निरीक्षण केंद्रांवर तर मध्यरात्री हा निर्देशांक ९३९ ते तब्बल १ हजार ७ पर्यंत नोंदविला गेला. हा कदाचित जागतिक विक्रम ठरावा!
परिसरनिहाय पाहता, उच्चभ्रू वसाहतींचा परिसर म्हणून ओळखल्या जाणार्या इंदिरानगरमध्ये दिवाळीपूर्वी ११९ असलेला हवा गुणवत्ता निर्देशांक (अटख) वाढून २८६ झाला, तर रात्री ८१२ पर्यंत पोहोचल्याची नोंद आहे. समतानगरमध्ये एक हजार ७, रोझा कॉलनीत ८०१, पंचवटीत २२१ आणि गंगापूररोडवर २१८ असा निर्देशांक नोंदवला गेला. अंबड औद्योगिक वसाहतीत कारखान्यांना सुट्टी असल्याने प्रदूषण तुलनेने १९८ च्या आसपास राहिले. दिवाळीनंतर फटायांचे प्रमाण कमी होणे आणि वार्यामुळे धूर विरळ झाल्याने ११ नोव्हेंबरला हाच निर्देशांक ९८ ते ११६ पर्यंत खाली आला. मात्र, १२ नोव्हेंबरला तो पुन्हा १६० ते १६७ दरम्यान नोंदविण्यात आला. यावरून प्रदूषणात तात्पुरती सुधारणा झाली असली, तरी समस्या कायम असल्याचे दिसते. रात्रीच्या वेळी फटायांच्या धुरामुळे संपूर्ण शहरावर प्रदूषणाचा काळा ढग साचला होता. यामुळे लहान मुले, वृद्ध आणि श्वसनविकार (दम्यासारखे आजार) असलेल्या नागरिकांना श्वास घेणेही मुश्कील झाले.
फटायांबरोबरच शहरात सुरू असलेली सिंहस्थ कुंभमेळ्याची विकासकामे, रस्त्यांची खोदकामे, बांधकामांमधून उडणारी धूळ, वाहनांचे वाढते उत्सर्जन आणि मंद वार्याचा वेग हेदेखील प्रदूषण वाढविणारे प्रमुख घटक ठरले. या भीषण प्रदूषणाला केवळ दिवाळीतील फटाकेच जबाबदार आहेत असे नाही. शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली सिंहस्थ कुंभमेळ्याची विकासकामे, रस्त्यांची खोदकामे, बांधकामांमधून उडणारी धूळ, वाहनांचे वाढते उत्सर्जन आणि मंद वार्याचा वेग यामुळे प्रदूषणात आणखी भर पडली आहे. त्यामुळे रस्त्यांची नियमित स्वच्छता, बांधकामस्थळांवरील धूळ नियंत्रण आणि फटायांच्या वापरावर मर्यादा या त्रिसूत्रीची काटेकोर अंमलबजावणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
गेल्या काही वर्षांत सातत्याने करण्यात आलेल्या जनजागृतीमुळे फटायांचा वापर आणि आवाज तुलनेने कमी झाल्याचे आशादायक चित्र सुरुवातीला होते. मात्र, यंदा सर्वांनीच सामाजिक भान विसरून बेजबाबदारपणाचा अतिरेक केला. प्रदूषणाची वाढती पातळी रोखण्यासाठी सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाने अनेकदा फटायांच्या वापरावर निर्बंध घालण्याचे किंवा विशिष्ट वेळेतच फटाके फोडण्याचे आदेश दिले आहेत. काही राज्यांत आणि शहरांत तर ठराविक प्रकारच्या फटायांवर पूर्ण बंदी घालण्याचे आदेश आहेत. परंतु या आदेशांची प्रत्यक्षात अंमलबजावणी कधीच होत नाही. न्यायालयाचे आदेश कागदावरच राहतात आणि स्थानिक प्रशासन व पोलीस यंत्रणा डोळेझाक करताना दिसते.
उत्सव साजरा करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण तो दुसर्याच्या जगण्याच्या अधिकारावर आणि आरोग्यावर घाला घालून मिळवलेला नसावा. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, प्रदूषणामुळे निसर्गाचा श्वास गुदमरत असताना आणि मानवी आयुष्य धोयात आले असतानाही राजकारणी, प्रशासन आणि खुद्द सामान्य नागरिकांनाही याबद्दल ना खेद वाटतो आहे, ना खंत!
नाशिक हे आपल्या सुंदर हवामानासाठी, गोदावरीच्या काठावर वसलेल्या पवित्र संस्कृतीसाठी आणि हिरवाईसाठी ओळखले जाणारे शहर आहे. या शहराचा ‘स्वच्छ हवेचा’ लौकिक टिकवून ठेवण्यासाठी आता केवळ भाषणे किंवा कागदोपत्री योजना चालणार नाहीत. न्यायालयांच्या आदेशांचे व प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कडक दंडात्मक व कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. बांधकाम प्रकल्पांवर धूळ नियंत्रणासाठी (Dust Suppression) कठोर नियम लागू केले जावेत आणि नागरिकांनीही स्वतःहून पर्यावरणपूरक सण साजरे करण्याची गरज आहे.
जर आपण आज या प्रदूषणकारी भयावह संकटाच्या निवारणासाठी तातडीने पावले उचलली नाहीत, तर येणार्या पिढ्यांना शुद्ध हवा विकत घेण्याची वेळ येईल. काही वर्षांपूर्वी जगात तिसरे युद्ध पाण्यावरून होईल, असे भाकित केले गेले होते. आज शुद्ध हवेच्या स्वामित्वासाठी देशोदेशात वादविवाद झाले तर आश्चर्य वाटू नये. नाशिककरांनो आणि देशवासियांनो, आता वेळ आली आहे जागृत होण्याची, कारण श्वास घेण्याचा अधिकार हा निसर्गाने प्रत्येकाला दिला आहे, तो कुणालाही हिरावून घेण्याचा हक्क नाही!




