धुळे – Dhule – प्रतिनिधी :
जिल्ह्यात कोरोनाने कहर केला असून सोमवारी एकाच दिवशी सहा जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. तर नवीन 149 पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्याची रूग्ण संख्या 3 हजार 574 वर पोहोचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज नांदरे येथील 70 वर्षीय महिला, धुळ्यातील सोन्या मारुती मंदिराजवळील 58 वर्षीय पुरुष, म्हळसर ता. शिंदखेडा येथील 70 वर्षीय पुरूष, धुळ्यातील प्रमोद नगरातील 70 वर्षीय पुरूष, निमगूळ ता.धुळे येथील 88 वर्षीय पुरूष व चिमठाणे येथील 65 वर्षीय महिला या करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण 122 जणांना मृत्यू झाला आहे. त्यात मनपा हद्दीतील 60 व धुळे ग्रामीणमधील 62 रूग्णांचा समावेश आहे.
जिल्हा रुग्णालयातील 56 अहवालांपैकी 28 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात गल्ली नं. 5 कुसुंबा 1, कुसंबा 1, जगदीश नगर 5, तुळशिराम नगर 3, यशवंत नगर 1, सुभाष नगर 1, चितोड़ रोड 2, गल्ली नं 8 देवपुर 1, साई दर्शन कॉलनी 1, गल्ली नं 9 विष्णु नगर 1, धुळे 2, गुरुनानक सोसायटी 1, पारोळा रोड प्रकाश चित्रपट गृहाजवळ 1, नाटेश्वर कॉलनी 1, मनोहर चित्रपट गृहामागे 1, आझाद नगर पोलिस ठाणे 1, फागणे 3, मोहाड़ीतील एका रूग्ण आहे.
दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयातील 119 अहवालांपैकी 23 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. पाथरे 2, महादेवपुरा 4, हुडको 2, दोंडाईचा शिंदखेडा 1, पिंपळ चौक दोंडाईचा 2, दाउळ शिंदखेडा 1, मोहादिया नगर दोंडाईचा 1, सद्गुरु कॉलनी दोंडाईचा 1, सिंधी कॉलनी 3, स्टेशन रोड 1, स्टेशन परिसर 1, हस्ती कॉलनी 1, देशमुख नगर 1, गांधी चौक शिंदखेडा 1, नरडाणा 1. तसेच शिरपूर उपजिल्हा रुग्णालयातील 32 अहवालांपैकी 20 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. जयहिंद कॉलनी शिरपुर 1, माळी गल्ली शिरपुर 3, खर्दे बु.3, मातोश्री कॉलनी शिंगावे 2, वरचे गांव रथगल्ली शिरपुर 1, होळनांथे 2, बोहरा गल्ली शिरपुर 1, विखरण 1, थाळनेर 1, पाटीलवाड़ा शिरपुर 1, करवंद नाका शिरपुर 1, हिंगोनी बु 1, भोरटेक 1, शिरपुरातील एक रूग्णाचा समावेश आहे.
साक्री तालुक्यातील भाडणे येथील सीसीसी केंद्रातील 18 अहवालांपैकी 6 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात शिवाजी नगर पिंपळनेर 2, स्वामी समर्थ नगर पिंपळनेर 2, धनदाई कॉलनी कासारे 1, न्हावी कॉलनी कासारेतील एक रूग्ण आहे.
महापालिका पॉलिकेक्निक मधील 74 अहवालांपैकी 20 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. जवाहर नगर 2, नकाणे 1, गुरुदत्त कॉलनी 2, श्रम साफल्य कॉलनी 1, अलंकार सोसायटी 2, जुने धुळे 5, सुभाष नगर 2, एलआयसी कॉलनी 2, मालेगाव रोड 2 व मोराणेतील एक रूग्ण आहे.
खाजगी लॅबमधील 47 अहवालांपैकी 23 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. वाड़ीभोकर रोड 2, नागाई कॉलनी 1, शिवाजी नगर, साक्री रोड 1, रामदास नगर साक्री रोड 1, अनमोल नगर 1, जयहिंद कॉलनी 2, रथगल्ली 5, नवनाथ नगर 1, सर्वोदय कॉलनी 1, सराफ बाजार 1, जीटीपी कॉलनी 1, नकाणेे 1, बाभुळवाडी 1, कासारे 1, शिंदखेड़ा 1, जानकी नगर 1, काळखेड़्यातील एका रूग्णाचा समावेश आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 47 अहवालांपैकी 15 अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह आले आहे. जीएमसी 2, गोकुळ नगर 1, नंदाणे 1, मोहाडी 1, कुमार नगर 1, शिंदखेडा 1, देवपूर 1, सुभाष नगर 1, धुळे शहरातील 6 रूग्ण आहेत.
तसेच रात्री साडेआठ वाजता महापालिका पॉलिकेक्निक सीसीसीमधील अँटीजन टेस्टच्या 66 (काल 44 पैकी 9 व आज 22 पैकी 5) अहवालांपैकी 14 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्हातील एकूण रूग्ण संख्या 3 हजार 574 एवढी झाली आहे.