चमौली | Chamoli
उत्तराखंडमधील (Uttarakhand) चमौली (Chamoli) येथे बुधवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली. नमामी गंगे प्रकल्पाच्या (Namami Gange project) ठिकाणी ट्रान्सफॉर्मरचा स्फोट (Transformer exploded) झाल्याने १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ७ गंभीर जखमी झाले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी मदतकार्य सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Crime News : जोधपूर हादरलं! ६ महिन्यांच्या चिमुकल्यासह चौघांना संपवलं अन् अंगणात फरफटत आणून पेटवलं
मिळालेल्या माहितीनुसार, चमोली जिल्ह्याल्या अलकनंदा नदीच्या काठावर ही घटना घडली आहे. अचानक ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला असून ७ जण जखमी झाले आहेत. चमोलीचे एसपी परमेंद्र डोवाल यांनी सांगितले की, जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या घटनेप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. उत्तराखंडचे अतिरिक्त पोलीस महासंचालक व्ही मुरुगेसन यांनी सांगितले की, ‘पोलिस उपनिरीक्षक आणि पाच होमगार्डसह जवळपास १५ जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणाचा तपास सुरू आहे. प्रथमदर्शनी असे दिसून आले आहे की, रेलिंगवर करंट होता. तपासात पुढील तपशील समोर येतील. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. खुद्द सीएम धामी देखील चमोलीला जाऊ शकतात अशी बातमी आहे.
पोलिस उपनिरीक्षक सजन्नकुमार नाऱ्हेडा यांच्याविरोधात अत्याचाराचा गुन्हा, राहुरीतील धक्कादायक घटनेमुळे खळबळ
उत्तराखंडमध्ये अनेक ठिकाणी सतत पाऊस पडत आहे. या पावसामुळेच ही घटना घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संततधार पावसामुळे गंगा, यमुनेसह उत्तराखंड राज्यातील सर्वच नद्यांना पूर आला आहे. पावसामुळे गंगेची उपनदी अलकनंदा नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पौरी जिल्ह्यातील श्रीनगर येथील GVK जलविद्युत प्रकल्पाच्या धरणातून सुमारे ३००० क्युमेक अतिरिक्त पाणी नदीमध्ये सोडण्यात आले आहे.