Monday, November 16, 2026
Homeब्रेकिंग न्यूजदिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या जयंतीचा शासकीय सूचीत समावेश

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या जयंतीचा शासकीय सूचीत समावेश

मुंबई | वृत्तसंस्था Mumbai

- Advertisement -

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या २२ जुलै या जयंतीचा राज्य शासनाच्या अधिकृत जयंती कार्यक्रमांच्या सूचीत समावेश करण्यात आला आहे. याबाबतचे सुधारित परिपत्रक जारी करण्यात आले असून, राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जयंती साजरी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन देऊन अजित पवार यांच्या जयंतीचा शासकीय सूचीत समावेश करण्याची मागणी केली होती. अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ही मागणी मांडली होती.

शासनाच्या निर्देशानुसार विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. हे परिपत्रक राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांनाही लागू राहणार आहे.

ताज्या बातम्या

सुनेत्रा

दादा, तुमचा प्रवास अर्धवट राहिला असेल, पण तुमच्या स्वप्नांचा प्रवास आम्ही...

0
पुणे | Puneदिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पुण्यात अनावरण करण्यात आले. पुणे जिल्हा परिषदेच्या पहिल्या...