धुळे – जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वेगाने वाढणारी कोरोना बाधितांची रूग्ण संख्या दोन दिवसांपासून काहीशी कमी झाली आहे. आज सकाळी 15 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले.
मनपाच्या पॉलिटेक्कीनमधील सीसीसी केंद्रातील 37 अहवालांपैकी 2 अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात 1 वडने कॉलनी व 1 भावसार कॉलनीतील रूग्णाचा समावेश आहे.
- Advertisement -
तसेच जिल्हा रूग्णालयातील 58 अहवालांपैकी 13 धुळे जिल्ह्यातील व 2 इतर जिल्ह्यातील असे एकुण 15 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात नवे भदाणे 3, मुकटी 3, अंबिका नगर 2, वेल्हाणे 2, सोनगीर 1, मुस्लीम नगरातील 2 व बांबरूड, भडगाव व गणपूर, चोपडा येथील प्रत्येक एका रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात बाधितांची संख्या 1 हजार 146 झाली आहे. त्यापैकी 673 रूग्ण कोरोना मुक्त झाले आहे.