Tuesday, April 23, 2024
HomeUncategorizedसाहित्य संमेलनात जिल्ह्याची 151 वर्षांची वाटचाल

साहित्य संमेलनात जिल्ह्याची 151 वर्षांची वाटचाल

नाशिक | राजेंद्र सूर्यवंशी | Nashik

ऐतिहासिक व संस्कृतीचा (History and culture) मोठा वारसा लाभलेल्या नाशिक जिल्ह्याच्या (nashik district) स्थापनेला दीडशे वर्षे पूर्ण झाली आहेत. ब्रिटिश राजवटीत 1869 साली जिल्ह्याची स्थापना झाली होती.

- Advertisement -

2019 मध्ये त्याला दीडशे वर्षे पूर्ण झाली आहेत. जिल्हा प्रशासन शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त (Golden Jubilee Year) विविध उपक्रम राबविणार होते परंतु या काळात करोना (corona) महामारीच्या संकटामुळे हे उपक्रम घेण्यात आले नाहीत. त्यानंतर आता साहित्य संमेलनाच्या (Literary convention) निमित्ताने नाशिक जिल्ह्याची वाटचाल, विकास व संकल्प (Development and resolution) या विषयावरील खास परिसंवाद जिल्हाधिकारी सूरज मांढरे (Collector Suraj Mandhare) यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. त्यानिमित्ताने जिल्ह्याचा सर्वागिण विकास व प्रगतीचा आलेख मांडला जाणार आहे.

राज्यातील महत्वपूर्ण जिल्हा अशी नाशिकची (nashik) ओळख आहे. अगदी रामायणकाळापासून (ramayan) ते सातवाहन राजवटीचा पाऊलखुणा या ठिकाणी पहायला मिळतात. पुरातन काळात जनस्थान, गुलशनाबाद (Gulshanabad) असा नाशिकचा उल्लेख असल्याचे पहायला मिळते. गोदाकाठी वसलेल्या नाशिकला पौराणिक (Mythical), सांस्कृतिक (Cultural), ऐतिहासिक असा समृध्द वारसा लाभला आहे.

आज राज्यातील नाशिक महत्वपूर्ण जिल्हा आहे. कृषी (Agriculture), औदयोगिकीकरण (Industrialization), पर्यटन (Tourism), साहित्य (Literature), क्रीडा (sports), दळणवळण या सर्व क्षेत्रात नाशिक जिल्ह्याने प्रगतीचा दूरचा पल्ला गाठला आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पुढाकार घेतला असून त्यांच्या संकल्पनेतून नाशिक जिल्ह्याची सर्वांगीण विकासाची माहिती देणारा परिसंवाद साहित्य संमेलनात आयोजित करण्यात आला आहे.

त्यात जिल्ह्याची ऐतिहासिक व भौगोलिक स्थित्यंतरे, खाद्य संस्कृती (Food culture), साहित्य व इतर क्षेत्रात विकासाची घेतलेली भरारी आदी विषयांची मांडणी करुन नागरिकांना त्याची माहिती दिली जाणार आहे. नाशिक जिल्हा स्थापनेस 151 वर्ष पूर्ण होत आहेत. इतिहास, भूगोल, शास्त्र, भाषा, कृषी, उद्योग या सर्वच विषयांत वास्तविकतेत आपला स्वतःचा उच्चतम दर्जा निर्माण करून एक वेगळे उदाहरण जिल्ह्याच्या रुपाने जगासमोर उभे आहे.

प्रभू रामचंद्रांपासून ते ब्रिटिश अमदानी पर्यंतचा इतिहास, चार ऍग्रोक्लायमेटिक झोन्स (Agroclimatic zones) असलेला जिल्हा, साहित्याचे मेरूमणी असलेले कुसुमाग्रज, वसंत कानेटकर यांसारख्या प्रभुती, संगीताची परिभाषा निश्चित करणारे पंडित विष्णू दिगंबर पलुसकर, बॉलिवूडचा पाया घालणारे दादासाहेब फाळके, देश रक्षणासाठी अहर्निश सेवेत असलेले आर्टिलरी सेंटर आणि नोटांचा कारखाना अशा या जिल्ह्याला 151 वर्षे पूर्ण होणे ही प्रत्येक नाशिककरांच्यादृष्टीने अभिमानाची बाब आहे.

इतिहासाच्या अनेक वळणावरून पुढे जात असताना आणि प्रगतीचे विविध टप्पे पार करताना जिल्ह्याने आपली वेगळी ओळख राज्य आणि देशात निर्माण केली आहे. 150 वर्षाची ही वाटचाल स्मरणीय व्हावी आणि पुढील कालावधीत जिल्ह्याच्या प्रगतीबाबत मंथन व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष पुढाकार घेऊन जिल्ह्यातील विविध क्षेत्रात कार्यरत मान्यवरांना एका मंचावर आणले.

विशेष म्हणजे या सर्वांनी 150 वर्षाचा सोहळा वैशिष्ट्यपुर्णरितीने साजरा करण्यासाठी आपल्या मौलिक सुचना केल्या. या सुचनांचा आधार घेऊन कार्यक्रमाची रुपरेषा तयार करण्यात आली होतीे. परंतु कार्यवाही सुरू करण्यापूर्वीच संपूर्ण जगाला अभूतपूर्व अशा करोना महामारीने ग्रासले व मागचे संपूर्ण वर्ष या रणकंदनात गेले. या महामारीला हरवून आज जवळपास सुरक्षित वातावरणात प्रवेश केलेला आहे. त्यामुळे साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा हा विषय पुढे आल्याने परिसंवाद होणार आहे. जिल्ह्यामध्ये आता सुरत चेन्नई महामार्ग (Surat Chennai Highway), समृद्धी महामार्ग (Prosperity Highway), पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे (

Pune-Nashik High Speed ​​Railway), ड्रायपोर्ट (Dryport) असे अनेकविध राष्ट्रीय महत्त्वाचे प्रकल्प कार्यान्वित होणार आहेत. त्या प्रकल्पाचा लाभ जिल्ह्यातील कानाकोपर्यातील व्यक्तीला होऊ द्यायचा असेल तर आपल्याला सुद्धा जिल्हा त्यादृष्टीने तयार करावा लागेल व अनेक उपक्रम हाती घ्यावे लागतील. त्यासाठी नाशिक मधील सर्वच क्षेत्रातील महत्वाची मंडळी एखाद्या कार्यक्रमासाठी एका छत्राखाली येण्याचाही दुर्मिळ योग या निमित्ताने साधला जात आहे. या परिसंवादातून नाशिकची वाटचाल अधोरेखीत होणार आहे..

- Advertisment -

ताज्या बातम्या