Sunday, September 8, 2024
Homeनाशिकनाशिक जिल्हा झाला १५५ वर्षांचा; गौरवशाली क्षणांचा प्रशासनाला पडला विसर

नाशिक जिल्हा झाला १५५ वर्षांचा; गौरवशाली क्षणांचा प्रशासनाला पडला विसर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

चिरेबंदी हवेलीत १८६९ सालापासून जिल्हाधिकारी कार्यालयाचा (Collector Office) कारभार सुरू झाला. वर्तमानात या देखण्या कार्यालयाची ’वैभवशाली’ वास्तू म्हणून नोंद घेतली जाते. अश्या या ब्रिटिश आमदनीत तयार केलेला नाशिक जिल्हा (Nashik District) आज शुक्रवार (दि.२६) जुलै रोजी १५५ वर्षांचा झाला आहे. ही बाब अभिमानाचीच असली तरी जिल्ह्याच्या निर्मितीला १५५ वर्षे होत असताना या गौरवशाली क्षणांचा विसर प्रशासनाला पडल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : पवार, ठाकरे, पटोलेंनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी; जरांगेंचे पहिल्यांदाच विरोधकांना आवाहन

नाशिक हे मौर्य, सातवाहन, यादव, मोगल, मराठे, निजाम आणि उत्तर मराठीशाहीतील पेशवे यांच्या कारकिर्दीमधील एक महत्त्वाचे शहर म्हणून नेहमीच गणले जात असे. पण नाशिक पेक्षाही अहमदनगर जिथे इंग्रजांचा महत्त्वाचा सैनिकी तळ होता तेथून नाशिकचे कामकाज बघितले जायचे. अहमदनगर हे जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण होते तर नाशिक हा तालुका होता. नाशिकचा एकंदरीत पसारा वाढत असतानाच अहमदनगरवरून सर्व कार्यभार सांभाळणे अवघड होऊ लागल्याने तत्कालीन मुंबई प्रांंतमध्ये झालेल्या बैठकीनुसार १० जुलै १८७९ रोजी भडोच ,कुलाबा, सोलापूर  नाशिक हे स्वतंत्र कलेक्टरेट म्हणजे जिल्हा झाल्याचे जाहीर करण्यात आले, मात्र नाशिक कलेक्टरेट हे न्यायालयीन कक्षा ठाणे याच्याशी संलग्न असल्याचे दिसते.

हे देखील वाचा : विद्यार्थ्यांचा भरपावसात जीवघेणा प्रवास

तर याच नोटिफिकेशननुसार अकोला तालुका हा न्यायालयीन (Court) कामासाठी सिन्नरला जोडल्याचे व सिन्नर हे ठाणे न्यायक्षेत्राच्या अंतर्गत असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. सी.आर.ओवेन्स हे नाशिकचे पहिले जिल्हाधिकारी होते. दि.२६ जुलै १८६९ च्या शासन आदेशानुसार अहमदनगर जिल्ह्याचे नाशिक, सिन्नर, इगतपुरी, दिंडोरी, चांदोरी, निफाड, येवला आणि अकोला असे ८ उपविभाग, तर खान्देश जिल्ह्याचे नांदगाव, मालेगाव आणि बागलाण असे तीन उपविभाग करण्यात आले. त्याचवेळी नाशिकला पूर्णत: विकसित जिल्हा म्हणून घोषित करण्यात आले. अल्पावधीत अकोला तालुका अहमदनगरमध्ये पुन्हा समाविष्ट करण्यात आला.

हे देखील वाचा : Nashik News : महिला स्वच्छता कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा; सोन्याचे मंगळसूत्र केले परत

तसेच १८७५ मध्ये बागलाण विभागातून (Bagalan Division) कळवण स्वतंत्र झाला आणि बागलाण व कळवण असे दोन तालुके अस्तित्वात आले. पेठ राज्य ब्रिटिश अधिपत्य प्रदेश झाले आणि १८७८ मध्ये त्याचे एका उपविभागात रूपांतर करण्यात आले.जिल्ह्याच्या प्रशासनाची सूत्रे सांभाळणार्‍या अधिकार्‍यांना कलेक्टर हे पदनाम दिले जात असे. नाशिक जिल्हा निर्मितीनंतर त्याचवर्षी या शहरात जिल्हाधिकार्‍यांचे मुख्यालय सुरू करण्यात आले. सध्याच्या ज्या दिमाखदार वास्तूत जिल्हा प्रशासनाचा गाडा हाकला जातो. तो तेव्हापासूनचा आजवर नाशिकला १०५ जिल्हाधिकारी लाभले असून, सध्या जिल्ह्याचा कारभार विद्यमान जिल्हाधिकारी जलज शर्मा (Jalaj Sharma) यांच्याकडे आहे.

हे देखील वाचा : भावली धरणालगत दरड कोसळली; रस्त्यावर दोन तास वाहतुकीचा खोळंबा

जिल्ह्याचे १०५ जिल्हाधिकारी

नाशिक जिल्हाचे आतापर्यंत १०५ जिल्हाधिकारी झाले असून या मालिकेत ३१ जानेवारी १९४७ पर्यंत ५३ इंग्रज जिल्हाधिकार्‍यांनी तर स्वातंत्र्यानंतर ५२ भारतीय आयएस अधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी पदावरुन काम केले आहेत. स्वतंत्र्यानंतर नाशिकचे पहिले जिल्हाधिकारी म्हणून व्हि. नान्जाप्पा (३.४.१९४७ ते २४.३ १९४८) यांनी पदभार स्विकारला होता. त्यानंतर विविध आयएएस अधिकार्‍यांनी या पदावरुन जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याचा प्रयत्न केलेला होता.  

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या