नंदुरबार । nandurbar। प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात गेल्या वर्षभरात रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्याने वाहन (vehicle)चालविल्यामुळे तसेच ओव्हरलोड वाहन, हेल्मेटविना दुचाकी चालविल्याने व वेगावर नियंत्रण न ठेवता वाहने चालविल्याने 264 अपघात (accidents)घडलेे आहेत. यामध्ये 156 जणांचा (people lost their lives) बळी गेला आहे. असे असले तरी गेल्या वर्षाच्या तुलनेत अपघातांमध्ये मृत्यूंची संख्या 18 टक्क्याने घटली असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन (Sub-Regional Transport Office) कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, वाहने चालवितांना सिटबेल्ट लावणे व दुचाकी चालवितांना हेल्मेटचा वापर करणे आवश्यक झाले आहे.निष्काळजीपणे व मद्यपान करुन वाहन बेदरकारपणे चालविल्यामुळे रस्ते अपघात घडत आहेत. अपघातांचे सत्र सातत्याने सुरुच आहे. परिवहन विभागाकडून याबाबत जनजागृती करण्यात आली असली तरी देखील वाहन धारकांकडून सदरची बाब गांभीर्याने घेण्यात येत नाही.
रस्ते अपघात कमी करण्यासाठी दरवर्षी शासन नवनवीन रस्ते सुरक्षा मोहीम राबविते. यामध्ये वाहतूक पोलिस, परिवहन विभागासोबत अनेक सामाजिक संस्था देखील सहभागी होतात. मात्र या मोहिमेनंतर देखील अपघातांचे प्रमाण कमी होतांना दिसत नाही. मद्यपान करुन वाहन चालविणे, निष्काळजीपणे वाहन चालविणे, ओव्हरटेक करणे, रस्त्यावरील खड्डे आदींसह इतर कारणांमुळे जिल्ह्यात रस्ते अपघात घडत आहेत.
बर्याचदा शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही अपघात घडून बळी गेल्याच्या घटना घडल्या आहेत.सन 2021 च्या तुलनेत सन 2022 मध्ये अपघातांमध्ये मृत्यू संख्येत 18 टक्क्याने घट झाल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून देण्यात आली आहे. जानेवारी ते नोव्हेंबर 2021 या कालावधीत 250 अपघातांमध्ये 191 जणांचा बळी गेला होता. तर 326 जण जखमी झाले होते. तर हेच प्रमाण 2022 मध्ये 264 अपघात घडले असून 156 जणांचा मृत्यू झाला असून 405 जण जखमी झाले आहेत. अपघातांमध्ये 6 टक्क्याने वाढ झाली आहे. तर मृत्यूंच्या प्रमाणात 18 टक्क्याने घट झाली आहेे.
तर जखमींचे प्रमाण 24 टक्क्यांनी वाढले आहे. मयतांमध्ये 18 ते 35 वयोगटातील नागरिकांचे प्रमाण अधिक आहे.जिल्ह्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये अपघात प्रवण स्थळांची पाहणी करुन आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच राष्ट्रीय व राज्य महामार्गावर ट्रामा सेंटर, ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांची, वैद्यकीय अधिकार्यांची दुरध्वनी यादी सादर करण्यात आली आहे.
वाहन चालकांची अनुज्ञप्ती निलंबित करण्यात आली आहेत. विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये रस्ता सुरक्षाबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. ऊस वाहतूक करतांना वाहनाना रिफ्लेक्टर लावण्यात आले आहेत आदी उपाययोजना उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून करण्यात आल्या आहेत.