Monday, September 28, 2026
Homeब्रेकिंग न्यूजनाशिकरोडला तरुणाची गोळ्या झाडून हत्या

नाशिकरोडला तरुणाची गोळ्या झाडून हत्या

नाशिक रोड | प्रतिनिधी Nashikroad

- Advertisement -

येथील महापालिकेच्या जुन्या बिटको रुग्णालयाजवळ अज्ञात हल्लेखोरांनी एका व्यक्तीवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या थरारक हल्ल्यात सुमित पगारे हे ठार झाले असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे

मिळालेल्या माहितीनुसार, सुमित पगारे हे जुन्या बिटको रुग्णालयाजवळ असताना काही अज्ञात हल्लेखोरांनी अचानक त्यांच्यावर रोखून धरत गोळीबार केला. या हल्ल्यादरम्यान एक गोळी सुमित पगारे यांच्या पोटाला लागली, तर दुसरी गोळी त्यांच्या बाजूने सुटून गेली. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात मोठी धावपळ आणि एकच खळबळ उडाली.

गोळीबार झाल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पोबारा केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुमित पगारे याला स्थानिकांच्या मदतीने तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे

घटनेची माहिती मिळताच नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी आणि तपास पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, हल्लेखोरांचा माग काढण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे.

हल्ल्याचे कारण अद्याप गुलदस्त्यात
हा गोळीबार नेमका कोणी आणि कोणत्या पूर्ववैमनस्यातून किंवा कारणातून केला, याचे गूढ अद्याप कायम आहे. जुन्या वादातून हा हल्ला झाला का? याचा शोध पोलीस घेत आहेत. संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली असून, याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलिसांकडून अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच या थरारक प्रकरणामागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

ताज्या बातम्या

शरद

Sharad Pawar NCP: आपण कुठेही जाणार नाही, यायचं असेल तर आमच्यासोबत...

0
मुंबई | Mumbaiराज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाचा मुद्दा गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष...