दोंडाईचा । श. प्र. dhule
शिंदखेडा तालुक्यातील टाकरखेडा येथे रासायनिक युरिया खतामुळे 16 शेळ्यांना विषबाधा झाली. त्यातील आठ शेळ्या दगावल्या. यामुळे सदर परिवाराचे उदरनिर्वाचे साधनच हिरावून गेले आहे.
शिंदखेडा तालुक्यातील टाकरखेडा येथील नथ्थू पौलाद मोरे हे जंगलात शेळ्या चारण्यासाठी गेले असता 16 शेळ्यांना युरिया रासायनिक खतापासून विषबाधा झाली.त्याबाबत तात्काळ पशुवैद्यकीय अधिकार्यांना माहिती देण्यात आली. त्यामुळे पशुविकास अधिकारी संकेत पुपलवाड, सहाय्यक पशुधन अधिकारी सुरेश राजभोज, डॉ. महेश माळी यांनी घटनास्थळी भेट देऊन औषधोपचार केले. दरम्यान आठ शेळ्या वाचविण्यात यश आले. मात्र आठ शेळ्या मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्या शेळ्यांचे शव विचछेदन करण्यात आले.
टाकरखेड येथील नथ्थू मोरे यांची हालाखीची परिस्थिती असून ते शेळी पाळून आपला उदरनिर्वाह करतात. आठ शेळ्या मृत्युमुखी पडल्यामुळे शेळीपालन करणारे मोरे यांचे 50 हजाराचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शासन स्तरावरून नुकसान भरपाई