Saturday, May 18, 2024
Homeक्रीडाIPL 2022 Mega Auction : पहिल्या दिवशी 161 खेळाडूंवर लागणार बोली; 'या'...

IPL 2022 Mega Auction : पहिल्या दिवशी 161 खेळाडूंवर लागणार बोली; ‘या’ खेळाडूचे सात वर्षानंतर पुनरागमन

बंगळुरु | Bangalore

आयपीएलचा मेगा लिलाव (IPL Mega Auction) प्रक्रिया बंगळुरुमध्ये (Bangalore) पार पडत आहे. मेगा लिलावात पहिल्या दिवशी 161 खेळाडूंवर बोली लागणार आहे…

- Advertisement -

यात ईशान किशन (Ishan Kishan), श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि डेविड वॉर्नर (David Warner) या स्टार्स खेळाडूंवर फ्रँचायझींच्या नजरा असणार आहे. या खेळाडूंना आपल्या ताफ्यात घेण्यासाठी 10 फ्रँचायझींमध्ये चांगलीच चढाओढ पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

अशी आहे मुकेश अंबानींची नवी कोरी ‘रॉल्स रॉयस’ अलिशान कार

मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) ईशान किशनला, दिल्लीने श्रेयस अय्यरला तर सनरायझर्स हैदराबादने डेविड व़ॉर्नरला मेगा लिलावापूर्वी रिलीज केले होते. अय्यर आणि डेविड वॉर्नर कॅप्टन्सीचे मटेरियल आहेत. त्यामुळे त्यांच्यावर मोठी बोली लागण्याची शक्यता आहे.

याशिवाय अन्य कॅप्ड आणि अनकॅप्ड़ खेळाडूंवरही बोली लागल्याचे पाहायला मिळू शकते. फलंदाज आणि गोलंदाज यांच्यापेक्षा अष्टपैलू खेळाडूला आपल्या ताफ्यात सामील करुन मजबूत संघ बांधणी करण्यावरही फ्रँचायझी भर देऊ शकतात.

IPL 2022 Mega Auction : खेळाडूंची यादी जाहीर; ५९० क्रिकेटपटूंवर लागणार बोली

श्रीशांतचे सात वर्षानंतर पुनरागमन

तसेच भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गेलंदाज श्रीशांत हा सात वर्षांच्या बंदीनंतर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. यंदाच्या लिलावात श्रीशांत याने स्वतःचे नाव दाखल केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार श्रीशांत याने त्याची बेसप्राईज ५० लाख रुपये इतकी ठेवली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या