Wednesday, November 20, 2024
Homeदेश विदेशतेराव्याचा कार्यक्रम आटोपून निघाले अन्… ; १७ जणांचा जागीच मृत्यू

तेराव्याचा कार्यक्रम आटोपून निघाले अन्… ; १७ जणांचा जागीच मृत्यू

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये भीषण अपघात घडला आहे. आगरा-अलीगढ महामार्गावर मीनी ट्रक आणि बसचा भीषण यांच्यात अपघात झाला. या अपघातामध्ये १७ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहे. तसेच, या घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची भितीही व्यक्त केली जात आहे. चंदपा तालुक्यात अलीगढ-आगरा महामार्गावर हा भीषण अपघात घडला आहे. मृतांमध्ये चार मुले, चार महिला आणि सात पुरुषांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आग्रा-अलिगड बायपासवर मीताई गावाजवळ ही घटना घडली. अपघातग्रस्त बस आगराहून डेहराडून निघाली होती. तर प्रवाशांनी भरलेली मिनी ट्रक समोरून येत होती. राष्ट्रीय महामार्गावर मीनी ट्रक आणि या बसची समोरा समोर धडक झाली. मीनी ट्रकमध्ये सुमारे ३० जण होते आणि ते सर्वजण मुकुंद खेडा येथे जवळच्या नातेवाईकाच्या तेराव्यासाठी गेले होते. तेराव्यानंतर सर्वजण खंडौलीजवळील सेवला गावात परतत होते.

- Advertisement -

हा अपघात इतका भीषण होता की या अपघातामध्ये १७ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु करत या अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींना रुग्णालयात दाखल केले. पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, अपघातातील सर्व जखमी सासनीहून खंडौलीकडे जात होते. चालकाला अटक करण्यात आले आहे. जखमींपैकी ४ जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, या अपघाताबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुःख व्यक्त केले आहे. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना तातडीनं मदत उपलब्ध करून देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदींकडून घटनेची दखल
या भीषण अपघाताची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली आहे. सोशल मीडियावर या घटनेबाबत त्यांनी शोक व्यक्त केला. तसेच, अपघाताबाबत दु:ख व्यक्त केले. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची भरपाई देण्याची घोषणाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या