Saturday, May 4, 2024
Homeनाशिकनिवृत्तीनाथ मंदिर विश्वस्त पदासाठी १८७ अर्ज

निवृत्तीनाथ मंदिर विश्वस्त पदासाठी १८७ अर्ज

त्र्यंबकेश्वर । Trimbakeshwer

संत निवृत्तीनाथ महाराज संस्थांच्या विश्वस्त मंडळावर मुलाखती द्वारे नऊ विश्वस्त घेतले जाणार आहेत. याकरिता धर्मदाय उपाआयुक्त कार्यालयात शेवटच्या मुदती अखेर १८७ अर्ज आले आहेत.

- Advertisement -

विश्वस्त पदासाठी संमती पत्रे धर्मदाय आयुक्तांकडे प्राप्त झाली आहे. धर्मदाय उपआयुक्त कार्यालयात अर्जदाराच्या मुलाखती घेऊन विश्वस्त निवडले जाणार आहे.

२८ डिसेंबर ते १२ जानेवारी या काळात धर्मादाय उपायुक्त यांच्यामार्फत मुलाखती घेतल्या जाणार आहेत. याबाबतचे वेळापत्रक कार्यालयात लावण्यात आले आहे. दरम्यान वारकरी असणाऱ्यांना विश्वस्तपदासाठी प्राधान्य मिळणार असल्याने अनेकांनी अर्ज भरले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या