Tuesday, June 25, 2024
Homeनगरशिक्षक मतदारसंघासाठी 19 प्रारूप मतदान केंद्र निश्चित

शिक्षक मतदारसंघासाठी 19 प्रारूप मतदान केंद्र निश्चित

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी नगर जिल्ह्यात 19 प्रारुप मतदान केंद्रांची निश्चिती करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली. शिक्षक मतदारसंघ

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारुप मतदान केंद्राच्या हरकतींबाबत सर्व राजकीय पक्षांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी सालीमठ यांनी नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी तालुकानिहाय मतदान केंद्राची निश्चिती करण्यात आली आहे. यामध्ये अकोले तालुका 1, संगमनेर 2, राहाता 2, कोपरगाव 2, श्रीरामपूर 1 नेवासा 1, शेवगाव 1, कर्जत 1, जामखेड 1, श्रीगोंदा 1, पारनेर 1, राहुरी 1, अहमदनगर शहर 2, अहमदनगर ग्रामीण 1 व पाथर्डी तालुक्यात 1 अशा एकूण 19 प्रारुप मतदान केंद्रांची निश्चिती करण्यात आल्याचे सांगितले.

यावर बैठकीस उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी कुठलाही आक्षेप नसल्याचे सांगितले. या निवडणुकीसाठी बुधवार, 15 मे रोजी अधिसूचना जारी केली जाईल. या निवडणुकीकरिता बुधवार, 22 मेपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येईल. उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी शुक्रवार, 24 मे रोजी केली जाईल तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवार, 27 मे अशी आहे. सोमवार 10 जून रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होईल. गुरूवार, 13 जून 2024 रोजी मतमोजणी होईल. ही संपूर्ण प्रक्रिया 18 जून रोजी पूर्ण होईल, अशी माहितीही जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी सालीमठ यांनी यावेळी दिली. बैठकीस सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या