Thursday, April 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजउद्या नाशिक शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद

उद्या नाशिक शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद

नाशिक | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

स्मार्ट सिटी कंपनीमार्फत फ्लोमीटर बसविण्याची कामे तसेच मनपा पाणीपुरवठा विभागामार्फत देखभाल व दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्याने उद्या शनिवार (दि.२०) रोजी संपूर्ण नाशिक शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.तसेच रविवार (दि. २१) रोजी सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती मनपा कार्यकारी अभियंता (पाणीपुरवठा विभाग) यांनी दिली आहे.

नाशिक पूर्व प्रभागात विविध महत्वाची कामे होणार आहेत. त्यामध्ये प्रभाग क्र. १४ येथील कालिका जलकुंभ भरणारी ५०० मि.मी. व्यासाची गुरुत्ववाहिनीवरील व्हॉल्व बदलणे, त्याच जलकुंभाला जोडलेल्या वितरण वाहिनीवरील व्हॉल्व दुरुस्त करणे, प्रभाग क्र. २३ मधील अशोक स्कूलसमोरील ४०० मि.मी. व्यासाच्या वाहिनीवर नवीन एअर व्हॉल्व बसविणे तसेच गांधीनगर जलकुंभ क्र. १, २, ३ व ४ वर व्हॉल्व आणि फ्लोमीटर बसविण्याची कामे यांचा समावेश आहे. तर नाशिक रोड विभागात भीमनगर जलकुंभ क्र. १ व २, शिवशक्ती नगर जलकुंभ तसेच पवारवाडी जलकुंभ क्र. १ व २ येथे व्हॉल्व व फ्लोमीटर दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत.

नवीन नाशिक विभागातील भवानी माता जलकुंभाची कामे तर सातपूर विभागात १२०० मि.मी. व्यासाच्या पाईपलाईनवरील तीन ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. या सर्व दुरुस्ती व स्थापनेसाठी २४ तासांचा शटडाऊन घेणे अपरिहार्य असल्याने शनिवारी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. तर रविवारी सकाळी पाणीपुरवठा कमी दाबाने होईल. नागरिकांनी या कालावधीत पुरेसा पाणी साठा करून घ्यावा व नाशिक महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Kopargaon : पश्चिमेचे पाणी गोदावरी खोर्‍यात वळवण्याबाबत चालढकल थांबवा

0
कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargaon सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून अरबी समुद्रात वाहून जाणारे पश्चिमेचे पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोर्‍यात वळवण्याबाबत राज्य आणि केंद्र सरकारची उदासीनता आता न्यायालयाच्या रडारवर आली आहे....