Monday, May 27, 2024
Homeनाशिकनिफाड : १९ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

निफाड : १९ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

शिरवाडे वाकद । येथील १९ वर्षीय युवकाने आज पहाटेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रमोद सोपान सोनवणे असे या युवकाचे नाव आहे.

अधिक माहिती अशी कि, येथील प्रभावतीनगर येथील आदिवासी वस्तीत विमल सोपान सोनवणे या आई व दोन मुलांसह राहतात. आज पहाटेच्या सुमारास ही घटना आशाबाई माळी यांच्या निदर्शनास आली. याबाबत त्यांनी तातडीने पोलीस पाटील यांना कळविले. पोलीस पाटील रामनाथ तनपुरे यांनी लासलगाव पोलीस स्टेशनला माहिती दिली.

- Advertisement -

घटनास्थळावर लासलगावचे पो.कॉ.इरफान शहा, एस.एस.इप्पर, पो.शिपाई दत्तात्रय कोळपे यांनी भेट देऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी निफाडच्या सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आला. स.पो.नि.खंडेराव रंजवे, पोलीस निरीक्षक राम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ.एच.सी.उंबरे,पो.कॉ. इरफान शहा अधिक तपास करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या