अहिल्यानगर (प्रतिनिधी)
शहरातील नेप्ती (ता. अहिल्यानगर) येथे असलेल्या श्री. छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात मोठी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात दोन चोरट्यांनी महाविद्यालयातील मुख्य प्रवेशव्दार व इतर विभागांची दारे तोडून आत प्रवेश केला व लेखा विभागातील लोखंडी कपाट उचकून त्यातील रोख 2 लाख 42 हजार 130 रूपये इतकी रक्कम लंपास केली.
हि घटना दिनांक 7 सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. सदर रक्कम विद्यार्थ्यांकडून फी म्हणून गोळा केली गेली होती व ती बँकेत भरण्यासाठी कार्यालयात ठेवली होती. याप्रकरणी गुरूवारी (11 सप्टेंबर) अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात दोघांविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. यशवंत रामचंद्र खर्डे (वय 55, रा. कोल्हार बु., ता. राहाता) यांनी फिर्याद दिली आहे.
डॉ. खर्डे यांच्या फिर्यादीनुसार, श्री. छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात रात्री साडेनऊच्या सुमारास अज्ञात दोन चोरट्यांनी मुख्य प्रवेशव्दार व इतर विभागांची दारे तोडून आत प्रवेश केला व लेखा विभागातील लोखंडी कपाट उचकून त्यातील रोख 2 लाख 42 हजार 130 रूपये इतकी रक्कम लंपास केली. सदर रक्कम विद्यार्थ्यांकडून फी म्हणून गोळा केली गेली होती व ती बँकेत भरण्यासाठी कार्यालयात ठेवली होती. चोरट्यांनी महाविद्यालयाच्या दारे व कुलूप तोडून नुकसानही केले आहे. या गुन्ह्यामुळे महाविद्यालय प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, 7 सप्टेंबर रोजी चोरी होऊन देखील यासंदर्भात 11 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास सुरू केला आहे.





