धुळे । dhule प्रतिनिधी
दोंडाईचा (dondaicha) शहरातील पंचवटी चौकातील किराणा दुकानदाराकडे (groceries) घरफोडी (burglary) करीत चोरट्यांनी (thieves) सुमारे 2 लाखांचा ऐवज लंपास केला. अज्ञात चोरट्यांवर (unknown thieves) गुन्हा (crime) नोंद झाला आहे.
चोपड्याची दिप्क्षीका माळी इंडिगो एअरवेज कंपनीची एअरहोस्टेज
याबाबत राजेंद्र पुंडलिक चिंचोलकर (वय 54) यांनी दोंडाईचा पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दि.1 रोजी चोरट्यांनी चिंचोलीकर यांचे बंद घर फोडले. घरातील 1 लाख रुपये किंमतीच्या 50 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन बांगड्या, 10 हजार रुपये किंमतीचे दोन टोंगल, 10 हजार रुपये किंमतीचे चांदीचे कडे आणि 62 हजार रुपयांची रोकड असा 1 लाख 82 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेला. पुढील तपास सपोनि संतोष लोले करीत आहेत.
VISUAL STORY : ऋतुराजविषयी जरा स्पष्टच बोलली सायली संजीव
करवंद येथे एकाला मारहाण- करवंद (ता.शिरपूर) गावात शासकीय गटारीत चेंबर बांधण्याच्या कारणावरुन सोनूलाल नाना शिरसाठ (वय 39) यांना तुळशीराम वाघ, समाधान वाघ दोघे (रा.करवंद) यांनी काठीने मारहाण केली. त्याात ते जखमी झाले. हा प्रकार काल दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडला. याबाबत शिरसाठी यांनी शिरपूर शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून वरील दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना पाटील करीत आहेत.