Monday, September 23, 2024
Homeमहाराष्ट्रघरापर्यंत सोडतो म्हणाला अन्...; धक्कादायक घटनेनं पनवेल हादरलं

घरापर्यंत सोडतो म्हणाला अन्…; धक्कादायक घटनेनं पनवेल हादरलं

मुंबई | Mumbai

- Advertisement -

रिक्षातून (auto rickshaw) घरी सोडण्याच्या बहाण्याने दोघांनी एका २० वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार (Gang Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सामूहिक अत्याचाराच्या या घटनेनं पनवेल (panvel) हादरलं आहे.

मध्यरात्री घरी जाण्यासाठी निघालेल्या तरुणीवर रिक्षाचालक आणि त्याच्या मित्रानेच सामूहिक अत्याचार (Woman gang-raped by auto driver) केला. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून अविनाश चव्हाण (२२) आणि सूरज देवडे (२१) अशी या आरोपींची नावे आहेत. एका वृत्त वाहिनीने याबाबत वृत्त दिलं आहे.

ऑनर किलिंगने महाराष्ट्र हादरला! खोट्या प्रतिष्ठेपायी कुटुंबाने लेकीला संपवल

नेमकं काय घडलं ?

पनवेलमध्ये राहणारी तरुणी खोपोली येथील एका हॉटेलमध्ये काम करते. शनिवारी रात्री उशिरा ही तरुणी तिची शिफ्ट संपवून कामावरुन घरी परतत होती. यानंतर ती पनवेलच्या मुख्य रस्त्यावरील ओरियन मॉलजवळील हॉटेलमध्ये जेवणासाठी गेली. जेवण आटोपेपर्यंत मध्यरात्र झाली. त्यानंतर ती घरी जाण्यासाठी मॉलजवळच ऑटोरिक्षाची वाट पाहत थांबली.

सामन्यतः या ठिकाणी गर्दी असते. त्यावेळी रिक्षाने आलेल्या दोन जणांनी ‘रस्त्यावर एकटीनं थांबणं सुरक्षित नाही. तुम्हाला घरी सोडतो. तुम्ही चला आम्ही काही अंतरावरच रिक्षा पार्क केली आहे’, असं सांगितले. त्यानंतर घरी जाण्यासाठी दुसरी रिक्षा न मिळाल्याने ही तरुणी त्यांच्यासोबत गेली. ते मुख्य रस्त्यापासून थोडे अंतर चालत गेल्यावर मॉलच्या मागे एका निर्जन भागात असताना त्यांनी तिला धमकावलं.

माझे बाबा मला मारत नाहीत, कारण ते लोकशाही मानतात; चिमुकल्याच्या ‘हा’ व्हिडिओ पाहून तुम्हाला हसू आवरता येणार नाही

त्यानंतर तिला बळजबरीने रस्त्यापासून दूर नेलं. रेल्वे रुळ ओलांडून स्टेशनपासून थोडं दूर असलेल्या एका पडक्या इमारतीत नेलं. दोघांनी तिच्यावर अत्याचार केला आणि तिच्या डोक्यावर वार करुन जखमी केलं. तरुणीने आरडाओरड केल्यानंतर आरोपींनी तिला तिथेच सोडून पळ काढला. या घटनेनंतर पीडित तरुणीने पनवेल पोलीस ठाणे गाठले आणि आरोपींविरोधात तक्रार दाखल केली.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपींचा शोध सुरू केला. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजवरुन दोघांची ओळख पटली. त्यानंतर पोलिसांनी दोघांना पनवेल स्थानकाजवळील झोपडपट्टीतून अटक केली. बलात्कार पीडित तरुणीची तक्रार मिळाल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

धक्कादायक! आरोग्य मंत्र्यांवर भर चौकात झाडल्या गोळ्या, प्रकृती गंभीर

- Advertisment -

ताज्या बातम्या