Tuesday, May 21, 2024
Homeनाशिकठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याला नाशिकमधून वीस हजार शिवसैनिक जाणार

ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याला नाशिकमधून वीस हजार शिवसैनिक जाणार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मागील वर्षी शिवसेनेत (Shivsena) पडलेल्या फुटीनंतर दोन्ही गटात दसरा मेळाव्यावरुन (Dasara Melava) चांगलाच वाद उफाळला होता. यंदा देखील दोन्ही गटांत शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दसरा मेळावा घेण्यावरून वाद निर्माण झाला होता. शिंदेंच्या शिवसेनेने अर्ज मागे घेतल्यामुळे ठाकरे गटाचा (Thackeray Group) शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याचा मार्ग मोकळा झाला.

- Advertisement -

त्यामुळे दसरा मेळाव्याला यंदाही शिवाजी पार्कवर उद्धव थाकारेंचीच तोफ धडाडणार आहे. या मेळाव्याची मुंबईत जय्यत तयारी केली जात आहे. नाशिकमधून शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या मेळाव्यासाठी २० हजार शिवसैनिक उपस्थित राहणार असल्याचा विश्वास शिवसेना सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड यांनी व्यक्त केला.

अजित पवार यांच्या सभेत मराठा आंदोलकांचा गोंधळ, दाखवले काळे झेंडे; पाहा VIDEO

मेळाव्याच्या पूर्व तयारीसाठी नाशिक शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक शालिमारच्या जिल्हा मंध्यवर्ती कार्यालयात पार पडली. त्यावेळी सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर उपजिल्हाप्रमुख देवानंद बिरारी, सचिन मराठे, युवासेना जिल्हाधिकारी बाळकृष्ण शिरसाठ, महानगर संघटक देवा जाधव, विधानसभाप्रमुख बाळासाहेब कोकणे, सुभाष गायधनी, शैलेश सुर्यवंशी, मसूद जिलानी, माजी उप माहापौर प्रथमेश गिते आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी यावेळी सांगितले की, आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा होत असल्याने त्याला विशेष महत्त्व आहे. गद्दारांची होत असलेली नाचक्की आणि महायुतीच्या सरकारमध्ये सुरू असलेला सावळा गोंधळ या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काय भाष्य करतात आणि कुणावर ते असूड ओढणार? याचीच उत्सुकता सर्वांना लागून आहे.

Nashik News : पहाटेच्या सुमारास घराला भीषण आग; एकाचा होरपळून मृत्यू, लाखोंचे नुकसान

यावेळी माजी गटनेते विलास शिंदे यांनी सांगितले की, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. कुठल्याची परिस्थितीत ठाकरे गटाचा भगवा महापालिकेवर फडकवायचाच. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणणे, हेच आमचे अंतिम उद्दिष्ट आहे. शिवसैनिक त्यादृष्टीने कामाला लागले आहेत. दरम्यान, दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे कुणावर आपली तोफ डागणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

झाडाला गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

- Advertisment -

ताज्या बातम्या