Monday, March 31, 2025
HomeनाशिकNashik Suicide News : २० वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

Nashik Suicide News : २० वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

वावी | वार्ताहर | Vavi

सिन्नर तालुक्यातील वावी येथील बसस्थानक (Bus Stand) परिसरात राहणाऱ्या श्याम सुनील गायकवाड (वय २०) या शाळकरी युवकाने (Youth) आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, श्याम हा घरातील एकमेव कमवता मुलगा होता. दररोज मोलमजुरी करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. मात्र, घरातील कमविता मुलगा गेल्याने त्यांचे कुटुंब (Family) उघड्यावर आले आहे. तसेच श्यामला एक भाऊ देखील असून ते लहान असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर त्या दोघा भावांना आईने लहानसे मोठे केले.

दरम्यान, या घटनेमुळे वावीसह परिसरात (Vavi Area) हळहळ व्यक्त होत आहे. तसेच या युवकाच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. तर या प्रकरणाचा पुढील तपास एपीआय संदेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह. किरण सोनवणे करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sonia Gandhi: “भारतातील शिक्षण व्यवस्थेची हत्या थांबवा”; सोनिया गांधींनी केंद्र सरकारला...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiकाँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी भारताच्या शिक्षण धोरणावरुन मोदी सरकारवर शाब्दीक हल्ला चढवला आहे. त्यांनी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय...